शासकीय पोर्टलवर खरेदी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:34 PM2017-09-25T23:34:35+5:302017-09-25T23:34:58+5:30

आगामी काळात सर्व प्रकारची शासकीय खरेदी ‘जेम’ या शासकीय पोर्टल द्वारे होणार आहे. त्यामुळे त्याचे आकलन करुन घ्यावे.

Binding to buy on government portal | शासकीय पोर्टलवर खरेदी बंधनकारक

शासकीय पोर्टलवर खरेदी बंधनकारक

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांचे निर्देश : जिल्ह्यातील विभाग प्रमुखांची प्रशिक्षण कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आगामी काळात सर्व प्रकारची शासकीय खरेदी ‘जेम’ या शासकीय पोर्टल द्वारे होणार आहे. त्यामुळे त्याचे आकलन करुन घ्यावे. त्याबाबत असणाºया सर्व नियमांचे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी सोमवारी दिले. &‘जेम’ अर्थात ‘गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस’ या संकेतस्थळाचा स्वीकार राज्य शासनाने केला आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना प्रशिक्षण देण्यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत त्यांनी निर्देश दिले.
या कार्यशाळेस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व या विषयातील तज्ज्ञ कृष्णा रेड्डी, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे, जिल्हा नियोजन अधिकारी टी. एस. तिडके, सागर पाटील, जिल्हा लेखाधिकारी कंगाली उपस्थित होते.
शासनस्तरावर यापूर्वी कार्यालयांमधून विविध पध्दतीने कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुख तसेच शासनस्तरावर खरेदी करण्यात येत होती. त्यात बदल करीत शासनाने ई-निविदा पध्दती सुरु केली. त्याचे पुढचे पाऊल म्हणजे&‘जेम’ होय. यात देशपातळीवर सर्व स्तरातील विक्रेते निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ शकत असल्याने स्पर्धा चांगली होऊन उत्तम उत्पादन, रास्त दरात मिळण्यास मदत होणार आहे. ई- मार्केटप्लेस राज्यसरकारी कार्यालयांना बंधनकारक करणारा शासन निर्णय २० आॅगस्ट रोजी निर्गमित केला आहे. याबाबत सर्वच कार्यालय प्रमुखांना याची माहिती असणे आवश्यक झाले असल्याने या कार्यशाळेत पॉवर पॉर्इंट सादरीकरणाव्दारे सर्व बाबींची व्यवस्थित माहिती देऊन सर्वांना प्रशिक्षित करण्यात आले. ‘जेम’ वरील खरेदी प्रक्रिया सहज सोपी असून त्यातून पारदर्शी व्यवहार होईल अशी यामध्ये व्यवस्था आहे.

Web Title: Binding to buy on government portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.