जि.प.अधिकाºयांचे कामबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 10:21 PM2017-11-03T22:21:47+5:302017-11-03T22:22:26+5:30

जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव येथील संवर्ग विकास अधिकारी मधुकर काशिनाथ वाघ यांनी गुरूवारी कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Binding of zilla parishad | जि.प.अधिकाºयांचे कामबंद

जि.प.अधिकाºयांचे कामबंद

Next
ठळक मुद्देजिप.अध्यक्षांना निवेदन : चाळीसगाव प्रकारणातील दोषींना अटक करा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव येथील संवर्ग विकास अधिकारी मधुकर काशिनाथ वाघ यांनी गुरूवारी कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकाºयांच्या दडपणामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी एका चिठ्ठीमध्ये नमूद केले. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व महाराष्टÑ विकास सेवेतील अधिकाºयांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन केले.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पं. स. चे गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांनी पं. स. ची बैठक सुरू असताना विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेचा गडचिरोली येथे निषेध नोंदविण्यात आला असून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेस देखील उपस्थित न राहण्याचा अधिकाºयांनी निर्णय घेतला. पंचायत समितीच्या कामकाजात वरिष्ठ पातळीवरून तसेच लोकप्रतिनिधींकडून दबाव आणल्या जातो. कामांमध्ये हस्तक्षेप होत असल्याने अधिकाºयांना दडपणाखाली काम करावे लागते. महाराष्टÑ विकास सेवेतील अधिकाºयांवर शौचालय, घरकूल बांधकाम तसेच नरेगा आदी कामांचे दडपण असते. या दडपणामुळेच मधुकर वाघ यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाºया लोकांवर गुन्हे दाखल करून अटक करावी, अशी मागणी महाराष्टÑ विकास सेवेतील अधिकाºयांच्या वतीने करण्यात आली. या संदर्भातील निवेदन जि. प. अध्यक्ष योगिता भांडेकर यांना देण्यात आले. संपूर्ण महाराष्टÑात शुक्रवारी कामबंद आंदोलन करण्यात आले.
यावेळी निवेदन देताना प्रकल्प संचालक कोठारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर, धनकर, बाबरे यांच्यासह गटविकास अधिकारी गोविंद खामकर तसेच सहायक गटविकास अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Binding of zilla parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.