आगीच्या ज्वालांमुळे पक्ष्यांचा मृत्यू
By Admin | Published: April 15, 2017 01:33 AM2017-04-15T01:33:17+5:302017-04-15T01:33:17+5:30
जंगलात लागलेल्या आगीमुळे अनेक पक्ष्यांचा तसेच वन्यजीवांचा मृत्यू झाला आहे.
वैरागड : जंगलात लागलेल्या आगीमुळे अनेक पक्ष्यांचा तसेच वन्यजीवांचा मृत्यू झाला आहे. मात्र पाणवठे तयार करण्याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
वासाळा बिट जंगल परिसरात लागलेल्या वणव्यामुळे पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी वन विभागाने या जंगलात पाणवठे तयार केले होते. या पाणवठ्यांमध्ये यावर्षी पाणी टाकले जात नसल्याचे प्रत्यक्षदर्शनी दिसून येत आहेत. पाणी टाकण्यासाठी वाहन किरायणे घेऊन मजूर नेमण्याचे निर्देश वन विभागाने दिले आहेत. त्यासाठी प्रत्येक वन परिक्षेत्राला निधीही उपलब्ध करून दिला आहे. मात्र वन विभागाचे अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत पाणवठ्यात पाणी टाकण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे पाण्याअभावी पक्षी व वन्यजीवांचा मृत्यू होत आहे. (वार्ताहर)