सापळे लावून पक्ष्यांची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:29 PM2019-05-27T22:29:15+5:302019-05-27T22:29:33+5:30

वैलोचना नदी पात्रात पाठणवाडा गावाजवळ सापळे लावून पक्ष्यांची शिकार केली जात आहे. सभोवतालचे पाणवठे आटल्याने तहानलेले पक्षी शिकाऱ्यांची शिकार बनत आहेत.

Birds hunting by traps | सापळे लावून पक्ष्यांची शिकार

सापळे लावून पक्ष्यांची शिकार

Next
ठळक मुद्देजलसाठे आटले : वन विभागाच्या पाहणीत आढळले सापळे

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : वैलोचना नदी पात्रात पाठणवाडा गावाजवळ सापळे लावून पक्ष्यांची शिकार केली जात आहे. सभोवतालचे पाणवठे आटल्याने तहानलेले पक्षी शिकाऱ्यांची शिकार बनत आहेत.
उन्हाळ्यात बहुतांश जलसाठे आटत असल्याने वन्यजीवांना नदीत पोहोचून आपली तहान भागवावी लागते. मर्यादीत जलसाठे राहत असल्याने या जलसाठ्यांवर पशु, पक्षी यांची मोठी गर्दी जमा होते. नदी परिसरातील पाणी जरी आटले असले तरी या ठिकाणी थंडावा राहत असल्याने बहुतांश पक्षी नदी किनाºयावर थांबतात. या पक्ष्यांना आपल्या जाळ्यात अडकविण्यासाठी शिकारी नदी पात्रात कृत्रिम पाणवठा तयार केला जात आहे. तहाणनेने व्याकुळ झालेले पक्षी पाणवठ्यावरचे पाणी पिण्यासाठी येतात. यावेळी त्यांना जाळ्यात अडकविले जाते. रोज शेकडो पक्ष्यांचे शिकार केली जाते. हा प्रकार वैरागड येथील वन कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर वैरागड येथील क्षेत्र सहायक जी. जी. लाखे व वनरक्षक विकास शिवनकर यांनी वैरागड वन परिक्षेत्रातील नदी, नाले, तलाव, बोड्यांची पाहणी केली. पाहणीदरम्यान वन्यजीवांची शिकार करण्यासाठी सापळे तयार करण्यात आले असल्याचे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व सापळे नष्ट करण्यात आले. वैलोचना नदी पात्रात सर्वाधिक सापळे रचण्यात आले होते.
वन जीवांची तहान जंगलातच भागविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होतो. या निधीतून जंगलातच जलसाठे तयार करणे आवश्यक आहे. मात्र वन विभाग जलस्त्रोत बळकट करण्यासाठी खरच खर्च करतो काय, हा प्रश्न आहे.
अशी केली जाते शिकार
नदी पात्रात थोडा खोल खड्डा खोदून त्यामध्ये पाणी टाकले जाते किंवा एखादा नैसर्गिक खड्डा असला तरी त्या सभोवताल जाळे पसरविले जाते. खड्ड्यापासून काही दूर अंतरावर झाडाच्या फांद्यांची झोपडी तयार केली जाते. या झोपडीत शिकारी लपून बसतो. झाडाच्या फांद्यांची झोपडी तयार केल्याने सदर झोपडी पक्ष्यांच्या लक्षात येत नाही. झोपडीपासून जाळ्यापर्यंत दोरी बांधली जाते. पक्षी पाणवठ्यावर आल्यानंतर शिकारी जाळाची दोरी ओढतो आणि पक्ष्यांना अलगद फाशात अडकविले जाते. एका वेळेवर पाच ते सहा पक्षी जाळात अडकतात. दिवसभरात शेकडो पक्ष्यांची शिकार केली जाते. लावा, पारडी, टिटवी, चांभारकुकडी आदी पक्ष्यांची शिकार केली जाते.

Web Title: Birds hunting by traps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.