भाजपा व काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू-आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:11 AM2019-04-03T00:11:19+5:302019-04-03T00:12:14+5:30
देशाची सत्ता सांभाळणाऱ्या भाजपा व काँग्रेसने वंचित बहुजनांच्या हितासाठी काहीच केले नाही. या दोन्ही पक्षांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. हे दोन्ही पक्ष भांडवलदारांचे असून जनतेच्या मनातून उतरले आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : देशाची सत्ता सांभाळणाऱ्या भाजपा व काँग्रेसने वंचित बहुजनांच्या हितासाठी काहीच केले नाही. या दोन्ही पक्षांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. हे दोन्ही पक्ष भांडवलदारांचे असून जनतेच्या मनातून उतरले आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.
चामोर्शी येथे मंगळवारी (दि.२) झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. मंचावर उमेदवार डॉ.रमेशकुमार गजबे, निरीक्षक राजू लोखंडे, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, रोहिदास राऊत, माला भजगवळी, दिलीप पदा, योगेंद्र बांगरे, योगेंद्र नंदेश्वर आदी उपस्थित होते. भाजपाकडून संविधान बदलविण्याचा प्रयत्न सुरू असताना काँग्रेसकडून मात्र संविधानाच्या बचावासाठी कोणताच प्रयत्न केला नाही. नागरिकांना केवळ भूलथापा देण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी राष्टÑहिताच्या नावाखाली देश व ग्रामीण भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. विकास रखडल्याने सत्ताधारी पक्षाविषयी नाराजी पसरली आहे. वंचित बहुजन आघाडीने सक्षम उमेदवार उभे केले आहेत, असे आंबेडकर म्हणाले.