ओबीसींच्या मुद्यावरून भाजप-काँग्रेस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:24 AM2021-06-27T04:24:11+5:302021-06-27T04:24:11+5:30

(बॉक्स) भाजपवर दिशाभूलचा आरोप करीत काँग्रेसही रस्त्यावर - भाजपकडून ओबीसींच्या मुद्यावर रास्ता रोको केला जात असल्याचे कळताच काँग्रेसनेही रस्त्यावर ...

BJP-Congress on the issue of OBCs | ओबीसींच्या मुद्यावरून भाजप-काँग्रेस रस्त्यावर

ओबीसींच्या मुद्यावरून भाजप-काँग्रेस रस्त्यावर

Next

(बॉक्स)

भाजपवर दिशाभूलचा आरोप करीत काँग्रेसही रस्त्यावर

- भाजपकडून ओबीसींच्या मुद्यावर रास्ता रोको केला जात असल्याचे कळताच काँग्रेसनेही रस्त्यावर उतरून ओबीसींचा मुद्दा लावून धरत भाजपच्या आंदोलनातील हवा काढण्याचा प्रयत्न केला. भाजपकडून ओबीसी समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार नारेबाजी केली, तसेच ओबीसी जनगणनेचा मुद्दाही उचलून धरला. सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधत इंदिरा गांधी चौकात गडचिरोली युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, अनुसूचित जाती विभाग, ओबीसी सेल, सोशल मीडिया, एनएसयूआय, सेवादलातर्फे निदर्शने करण्यात आली.

रद्द केलेले राजकीय आरक्षण पूर्ववत करून ओबीसींची केंद्र सरकारने जनगणना करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. केंद्र सरकारविरुद्ध विविध घोषणाबाजीही करण्यात आली.

यावेळी प्रामुख्याने जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महिला काँग्रेस अध्यक्ष भावना वानखेडे, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, प्रदेश महिला काँग्रेस सचिव डॉ. चंदा कोडवते, प्रदेश युवक काँग्रेस सचिव विश्वजित कोवासे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सोशल मीडिया प्रदेश सचिव नंदू वाईलकर, जिल्हा आदिवासी विभाग अध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, सोशल मीडिया अध्यक्ष कुणाल पेंदोरकर, माजी नगरसेवक नंदू कायरकर, लता मुरकुटे, मनोहर नवघडे, नितेश राठोड, संजय चन्ने, दिवाकर निसार, पुरुषोत्तम बावणे, कमलेश खोब्रागडे, ढिवरू मेश्राम, पंकज बारसिंगे, तोफिक शेख, आशिष कामडी, हेमंत भांडेकर, संजय वानखेडे, योगेश नैताम, गौरव एनप्रेद्दीवार, प्रेमानंद डोंगरे, संदीप तिमांडे, राहुल पत्तीवार, मयूर गावतुरे, समीर ताजने, नीता वडेट्टीवार, पुष्पा ब्राह्मणवाडे, वंदना धोटे आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: BJP-Congress on the issue of OBCs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.