ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपबहुल सरपंचांचा वरचष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2022 11:55 PM2022-10-18T23:55:56+5:302022-10-18T23:58:27+5:30

यातील १० ग्रामपंचायतींवर भाजपबहुल सरपंचांचा वरचष्मा राहिला आहे. आदिवासी विद्यार्थी संघाचे ३ तर काँग्रेसबहुल ३ सरपंच झाल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ग्रामपंचायतीत वर्चस्व आहे. २ ठिकाणचे सरपंच कोणत्याही गटाशी निगडित नाहीत. धानोरा तालुक्यातील कामतळा येथे सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नसल्याने हे सरपंचपद रिक्त राहिले.

BJP-dominated sarpanchs prevail in Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपबहुल सरपंचांचा वरचष्मा

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपबहुल सरपंचांचा वरचष्मा

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात रविवार १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी ठिकठिकाणच्या तहसील कार्यालयात झाली. यातील १० ग्रामपंचायतींवर भाजपबहुल सरपंचांचा वरचष्मा राहिला आहे. आदिवासी विद्यार्थी संघाचे ३ तर काँग्रेसबहुल ३ सरपंच झाल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ग्रामपंचायतीत वर्चस्व आहे. २ ठिकाणचे सरपंच कोणत्याही गटाशी निगडित नाहीत. धानोरा तालुक्यातील कामतळा येथे सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नसल्याने हे सरपंचपद रिक्त राहिले.
पाच ठिकाणी अविराेध निवड झाली. त्यात धानाेरा तालुक्यातील जप्पी, कामतळा आणि लेखा तसेच आरमाेरी तालुक्यातील नरचुली आणि एटापल्ली तालुक्यातील काेटमी येथील निवडणूक अविराेध झाली. कामतळा येथे सरपंचपद रिक्त आहे.

अनंती पदा ठरल्या जांभळीच्या पहिल्या सरपंच

    आरमोरी तालुक्यातील नरचुली ग्रामपंचायतचे विभाजन होऊन नव्याने तयार झालेल्या जांभळी ग्रामपंचायतच्या  पहिल्याच सरपंचपदी विराजमान होण्याचा बहुमान काँग्रेसप्रणित उमेदवार अनंती मनिराम पदा यांना मिळाला. या निवडणुकीत  आरमोरी पंचायत समितीच्या माजी सभापती बबिता जीवनदास उसेंडी यांना पराभव पत्करावा लागला. 
    आरमोरी तालुक्यातील नरचुली व जांभळी या दोन ग्रामपंचायतच्या निवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये नरचुली येथील ग्रामपंचायत सदस्य व सरपंच हे अविरोध निवडून आले. जांभळी ग्रामपंचायतचे सर्व सात सदस्य अविरोध निवडून आले. मात्र सरपंचपदासाठी एकमत झाले नाही.
    जांभळी ग्रामपंचायतच्या पहिल्या सरपंचपदासाठी १६ ऑक्टोबरला निवडणूक  घेण्यात आली. त्याचा निकाल  मंगळवारी सकाळी  जाहीर झाला. यामध्ये माजी पं. स. सभापती बग्गू ताडाम यांच्या गटाला धक्का बसला.  पंचायत समितीच्या माजी सभापती बबिता उसेंडी यांचा पराभव झाला तर रामचंद्र टेकाम गटाच्या अनंती मनिराम पदा या निवडून आल्या.अनंती पदा यांना  ४६९ मते मिळाली तर बबिता उसेंडी  यांना ३६४  मते मिळाली. 
    नोटावर २३ उमेदवारांनी पसंती दर्शविली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. एस. मडावी, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून ए. आर. मेंढे यांनी काम पाहिले. तालुक्यात निवडणूक शांततेच्या वातावरणात आणि कुठेही गडबड न हाेता पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास साेडला. 

एटापल्लीत आविसंचे वर्चस्व

-    एटापल्ली तालुक्यातील कोहका ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आदिवासी विद्यार्थी संघ तथा ग्रामसभेचे वर्चस्व आले आहे. एकूण सात सदस्यीय ग्रामपंचायतीत आविसचे अंतू बारसा यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच व ५ सदस्य अशा एकूण सहा जागांकरिता ही निवडणूक झाली. 
-    कोटमी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. या ठिकाणीही आविसबहुल सरपंच निवडल्या गेल्याचा दावा केला जात आहे. सरपंचपदाकरीता आविसं तथा ग्रामसभेकडून वनिता संजय हिचामी आणि भाजपाचे सुनीता बंडू नरोठे उभे होते. आविसंच्या वनिता हिचामी ३६१, तर भाजपाच्या सुनीता नरोठे यांना २८७ मते मिळाली. नोटावर तब्बल ६८ मते पडली. 
-    सपना अंताराम पुगांटी, शिलो सनकू दुग्गा, अशोक जयराम मडावी, लता गणू पुंगाटी, नाना रावजी कडयामी, जनली दिवाकर नरोठे हे विजयी झाले. आविसंला सर्वाधिक ४ जागा मिळाल्याने एकहाती सत्ता आली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, नंदू मट्टामी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रज्वल नागूलवार, मंगेश हलामी, मनिराम हिचामी, सुधाकर टेकाम यांच्यासह आविस व ग्रामसभेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

घोटमध्ये रूपाली दुधबावरे, तर दुर्गापूरमध्ये सोनी मंडल सरपंच

-    चामोर्शी तालुक्यातील घाेट व दुर्गापूर या दोन ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली. दोनही ठिकाणी भाजपबहुल उमेदवार विजयी झाल्या आहेत. थेट मतदारांकडून सरपंचाची निवड असल्याने याबाबत उत्सुकता होती.  
-    घोटच्या सरपंचपदी अनुसूचित जाती प्रवर्गातून व थेट जनतेतून रूपाली प्रशांत दुधबावरे निवडून आल्या. त्या ३३२१ पैकी १४४७ मतांनी विजयी झाल्या. याशिवाय दुर्गापूरच्या सरपंचपदी नामाप्र (स्त्री) राखीव गटातून सोनी दिनेश मंडल यांनी २१७२ मतांपैकी १०९८ मते घेऊन सरपंचपदासाठी बाजी मारली.

 

Web Title: BJP-dominated sarpanchs prevail in Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.