भाजप सरकारने शेतकºयांना उद्ध्वस्त केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 11:19 PM2017-09-17T23:19:50+5:302017-09-17T23:20:03+5:30

भाजप सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची फसवणूक करून शेतकºयांना उद्ध्वस्त करण्याचे काम भाजप सरकारने केले. या सरकारने नोटबंदी, जीएसटी, कर्जमाफीची आॅनलाईन प्रक्रिया,...

BJP government destroyed the farmers | भाजप सरकारने शेतकºयांना उद्ध्वस्त केले

भाजप सरकारने शेतकºयांना उद्ध्वस्त केले

Next
ठळक मुद्देसुरेश भोयर यांची टीका : चामोर्शीत काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : भाजप सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची फसवणूक करून शेतकºयांना उद्ध्वस्त करण्याचे काम भाजप सरकारने केले. या सरकारने नोटबंदी, जीएसटी, कर्जमाफीची आॅनलाईन प्रक्रिया, लावून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व व्यापारी वर्गावर अन्याय केला आहे. या अन्यायाच्या विरोधात पेटून उठण्याची गरज आहे, असे प्रतिपादन काँग्रेस पार्टीचे प्रदेश महासचिव व जिल्ह्याचे पक्ष निरिक्षक सुरेश भोयर यांनी केले.
चामोर्शी येथील दिना विश्रामगृहात काँग्रेस पदाधिकाºयांच्या मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मेळाव्याला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी खासदार मारोतराव कोवासे, लोकसभा क्षेत्र प्रमुख महेंद्र ब्राह्मणवाडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख रजनिकांत मोटघरे, काँग्रेस गडचिरोली तालुका अध्यक्ष शंकर सालोटकर, प्रभाकर वासेकर, गंगाधर गण्यारपवार, किसनराव शेट्टे, विश्वजित कोवासे, जि.प. सदस्य कविता भगत, रूपाली पंदीलवार, जिल्हा सचिव राजेश ठाकूर, काँग्रेस तालुकाध्यक्ष निशांत नैताम, न.पं. उपाध्यक्ष राहूल नैताम, सभापती सुमेध तुरे, विजय शात्तलवार, नगरसेवक अविनाश चौधरी, शामराव लटारे, वैभव भिवापुरे, विनोद खोबे, पं.स. सदस्य धर्मशीला सहारे, शीला वैरागडे, प्रमोद भगत, रवी धोटे, रामभाऊ मानापुरे, रमेश कोडापे, निलकंठ निखाडे, परशुराम तुंबडे, धिरज उराडे, संजय पंदीलवार, पंकज वायलालवार, लोकेश शात्तलवार आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. नामदेव उसेंडी यांनी गाव तिथे काँग्रेस कमिटीने काम करण्याची गरज आहे. भाजपा सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे, असे प्रतिपादन केले. माजी खासदार कोवासे यांनी काँग्रेसच्या कालावधीत अनेक विकासकामे झाली असून आता विकास ठप्प पडला असल्याचे प्रतिपादन केले.
प्रास्ताविक निशांत नैताम, संचालन व आभार कार्याध्यक्ष सुरेश भांडेकर यांनी मानले. मेळाव्याला तालुक्यातील सरपंच, सदस्य, सेवा संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: BJP government destroyed the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.