भाजप सरकारने जनतेला देशोधडीला लावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:54 AM2018-11-07T00:54:27+5:302018-11-07T00:56:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : चार वर्षांपूर्वी अच्छे दिनाचे गाजर दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने जनतेला देशोधडीला लावले. सरकारच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : चार वर्षांपूर्वी अच्छे दिनाचे गाजर दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने जनतेला देशोधडीला लावले. सरकारच्या चुकीचे निर्णय व धोरणामुळे सर्वसामान्यांंचा भ्रमनिराश झाला आहे, असा आरोप महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव रवींद्र दरेकर यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
यावेळी माजी जि. प. सदस्य पी. आर. आकरे, ईश्वर कुमरे, विद्यमाने जि. प. सदस्य मनीषा दोनाडकर, श्रीनिवास आंबटवार, सुभाष सपाटे, विजय सुपारे, शालिक पत्रे, गणेश प्रधान, नंदू खानदेशकर आदी उपस्थित होते.
यावेळी दरेकर म्हणाले, नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली. दीड कोटी लहान उद्योग व व्यापार डबघाईस आले आहेत. पेट्रोल, डिझेल व गॅस दर वाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर होत असून खते व बि-बियाणांचे भाव वाढत आहेत. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाºया भाजप सरकारकडून जनतेवर विविध प्रकारचे टॅक्स व कर आकारले जात आहे. शेतकरी व जनतेच्या हिताविरोधी या सरकारची धोरणे आहेत. चार वर्षात या सरकारची कामगिरी काहीच नाही. मात्र जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात होत आहे. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना शेतकºयांना डिझेलवर सबसिडी मिळत होती. मात्र ही सबसिडी आता बंद करण्यात आली आहे. टॅक्स लावा व पैसा वसूल करा, अशी निती या सरकारकडून अवलंबिली जात आहे. अनेक गंभीर प्रश्न या सरकारच्या काळात निर्माण झाले आहेत, असेही दरेकर यावेळी म्हणाले.
वित्त आयोगाने राज्य शासनाचा अहवाल सादर केला. यामध्ये सन २०१० ते २०१४ या काळात १७ टक्के महसूल वसूल होत होता. मात्र आता या सरकारच्या काळात वसुलीची टक्केवारी १० टक्क्यावर आहे. हा अहवालसुद्धा सरकारने दाबून ठेवला आहे. गेल्या चार वर्षांत विद्यमान सरकारची कामगिरी शून्य असून या अपयशाचा जाब विचारण्याची वेळ आता आली आहे. अपयश झाकण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा भाजप सरकारकडून पुढे आणला जात आहे, अशी टिका रवींद्र दरेकर यांनी यावेळी केली.
रवी व मुल्लूर चक या गावाचे आरमोरी नगर परिषदेत समायोजन करण्यात आले नाही. त्यामुळे ही दोन्ही गावे बेवारस झाली आहेत. गावातील नागरिकांना दाखले मिळण कठिण झाले आहे. हा प्रश्न घेऊन आपण दिवाळीनंतर जिल्हाधिकाºयांची भेट घेणार आहोत, असे दरेकर यांनी सांगितले.