भाजप नेते नारायण राणेंच्या वक्तव्याचे जिल्हाभर संतप्त पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 05:00 AM2021-08-25T05:00:00+5:302021-08-25T05:00:53+5:30

जनआशीर्वाद यात्रेकरिता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात पातळी सोडत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मंगळवारी येथील शिवसेना कार्यालयासमोरील सागर चौकात राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. या निषेध आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख (आरमोरी क्षेत्र) सुरेंद्रसिंह चंदेल यांनी केले.

BJP leader Narayan Rane's statement has angered the entire district | भाजप नेते नारायण राणेंच्या वक्तव्याचे जिल्हाभर संतप्त पडसाद

भाजप नेते नारायण राणेंच्या वक्तव्याचे जिल्हाभर संतप्त पडसाद

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा शिवसैनिकांनी आपापल्या पद्धतीने निषेध केला. गडचिरोलीसह कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी आणि दक्षिणेकडील एटापल्ली येथे प्रामुख्याने याचे पडसाद उमटले. आरमोरीत पुतळा जाळण्यात आला तर इतर ठिकाणी फोटोला चपलांचा मार देऊन शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.  दरम्यान भाजपनेही राणे यांच्या अटकेचा निषेध केला.

गडचिरोलीत राणे यांच्याविरोधात पाेलीस ठाण्यात तक्रार
गडचिराेली येथील इंदिरा गांधी चौकात भाजपा नेते नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांबद्दलच्या वक्तव्याबद्दल घोषणा देत निषेध करण्यात आला. तसेच राणे यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी गडचिरोली पोलीस स्टेशनला एफआयआर नोंदविण्यात आला. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख राजू कावळे, विधानसभा संघटक नंदू कुमरे, शिवसेना शहर प्रमुख रामकिरीत यादव, माजी नगराध्यक्ष डाॅ. अश्विनी यादव, तालुका प्रमुख गजानन नेताम, शेखर उईके, आशिष मिश्रा, संजय आकरे, नवनाथ उके, विलास जराते, आकाश समंतवार, विशाल उरकुडे, शरद गेडाम, अनिकेत झरकर, दीपक भांडेकर, अरविंद साखरे, नईम शेख तसेच बहुसंख्य शिवसैनिक हजर होते.

कुरखेड्यात ‘जोडे मारो’ आंदोलन
कुरखेडा : जनआशीर्वाद यात्रेकरिता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात पातळी सोडत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मंगळवारी येथील शिवसेना कार्यालयासमोरील सागर चौकात राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. या निषेध आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख (आरमोरी क्षेत्र) सुरेंद्रसिंह चंदेल यांनी केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी, माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, देसाईगंजचे माजी तालुकाप्रमुख नंदू चावला, माजी नगरसेवक पुंडलिक देशमुख, विकास प्रधान, राकेश खुणे, विजय पुस्तोडे, पुरुषोत्तम तिरगम, अज्जू सय्यद, डॉ. अनिल उईके आणि शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांच्या नेतृत्वात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

आरमोरीत राणे यांच्या पुतळ्याचे दहन
आरमोरी : मुख्यमंत्र्यांबद्दलच्या वक्तव्याचा निषेध म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. पुतळ्याला चपला मारून नंतर तो पुतळा पेटविण्यात आला. यावेळी जवळपास १ तास रास्ता रोको करण्यात आला. आरमोरी येथे युवासेना व शिवसेनेच्या वतीने शिवसैनिक आणि युवासैनिकांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राणे मुर्दाबादसह त्यांच्याविरुद्ध विविध नारे लावण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्यासह युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख चंदू बेहरे, उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, माजी सभापती शेखर मने, महिला संघटिका हेमलता वाघाडे, माजी जि.प. सदस्य वेणू ढवगाये, न.प.चे बांधकाम सभापती सागर मने, भूषण सातव, नगरसेवक माणिक भोयर, कवडू सहारे, लहानू पिलारे, पुंजीराम मेश्राम, राजू ढोरे, विजय मुर्वतकर, सरपंच रमेश कुथें, सरपंच प्रशांत किलनाके, माजी नगराध्यक्ष महेंद्र मोहबन्सी, सरपंच विजय दडमल, पुंडलिक देशमुख यांच्यासह अनेक महिला, शिवसैनिक व युवा सैनिक होते.

राणेच्या अटकेचा भाजपकडून निषेध
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या अटकेचा गडचिराेलीतील इंदिरा गांधी चाैकात भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला. राज्य सरकारची ही कृती म्हणजे, अराजकता निर्माण झाली असल्याचा आराेप यावेळी आ.डाॅ. देवराव हाेळी यांनी केला. यावेळी नगराध्यक्ष याेगीता पिपरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी गाेविंद सारडा, प्रमाेद पिपरे, प्रशांत वाघरे, रमेश भुरसे, मुक्तेश्वर काटवे, याेगीता भांडेकर, अनिल कुनघाडकर, विलास दशमुखे आदी उपस्थित हाेते.

 

Web Title: BJP leader Narayan Rane's statement has angered the entire district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.