आमदारांच्या उपस्थितीत भाजप उमेदवारांचे नामांकन दाखल

By admin | Published: October 14, 2015 01:58 AM2015-10-14T01:58:30+5:302015-10-14T01:58:30+5:30

दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी ४६ उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले.

BJP nominees nominated in the presence of MLAs | आमदारांच्या उपस्थितीत भाजप उमेदवारांचे नामांकन दाखल

आमदारांच्या उपस्थितीत भाजप उमेदवारांचे नामांकन दाखल

Next

दुसरा टप्पा : कुरखेड्यात १७ जागांसाठी १०० उमेदवारांचे ११९ अर्ज दाखल
कुरखेडा : दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी ४६ उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले.
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी आ. क्रिष्णा गजबे यांच्या नेतृत्वात शक्तिप्रदर्शन करुन अर्ज सादर केले. दुसऱ्या टप्प्यातील नगर पंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी कुरखेड्यात ४६ जणांनी अर्ज सादर केले. आतापर्यंत येथे १७ जागांसाठी १०० जणांनी ११९ उमेदवारी अर्ज सादर केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यू. एम. तोडसाम यांनी दिली. दरम्यान सोमवारी भाजप कार्यकर्त्यांनी आ. क्रिष्णा गजबे यांच्या नेतृत्वात शहरातून रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, पक्ष निरीक्षक मोतीलाल कुकरेजा, नाना नाकाडे, तालुकाध्यक्ष राम लांजेवार, जिल्हा उपाध्यक्ष विलास गावंडे, जिल्हा सचिव चांगदेव फाये, तालुका संघटक जलाल सय्यद, रामहरी उगले, रमेश बावनथडे, रामनाथ डोंगरवार, वामदेव सोनकुसरे, गणपत सोनकुसरे, बबलू हुसैनी, रवींद्र गोटफोडे, मनीष शर्मा, नागेश फाये, अ‍ॅड. उमेश वालदे, आज्ञापाल सहारे, जगदीश दखने, चरणदास रासेकर, उल्हास देशमुख, संगीता टेकाम, संगीतादेवी सयाम, माया नैताम, सुभाष नैताम, नंदिनी दखने, सोनिका वैद्य, धनवंता खोब्रागडे, प्रतिभा बोरकर, अल्का मरसकोल्हे, दीपाली देशमुख, स्वाती नंदनवार, ज्ञानेश्वर मेश्राम, अल्पसंख्यक आघाडीचे प्रमुख युसुफभाई पठाण, वृषभ मेश्राम, शिवा वडीकर, हेमंत गजबे, ईश्वर बन्सोड यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: BJP nominees nominated in the presence of MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.