चामोर्शी तालुक्यातील ६९ पैकी ४४ ग्रामपंचायतीत भाजपाची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:38 AM2021-02-24T04:38:20+5:302021-02-24T04:38:20+5:30
गडचिरोली भाजप जिल्हा अध्यक्ष किसन नागदेवे, डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायतीवर भाजपाचे उमेदवार ...
गडचिरोली भाजप जिल्हा अध्यक्ष किसन नागदेवे, डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायतीवर भाजपाचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपचे ४४ सरपंच विराजमान झाले आहेत. शिवसेना या पक्षाने कुठलेही काम न करता भाजपाच्या ग्रामपंचायत सदस्यांना एक कोटीच्या विकास कामाचा निधी मिळवून देऊ, अशी खोटी आश्वासने देऊन त्यांना भूलथापा देऊन त्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकल्याची माहिती पसरवून जनतेची व त्या सदस्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप, आ.डॉ. देवराव होळी व भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख यांनी केला.
बहादुरपूर, सुभाषग्राम, वायगाव, सिमुलतला, चापलवाडा या पाचही ग्रामपंचायतीवर भाजपाच्या असताना त्या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा फडकला याची खोटी माहिती वर्तमानपत्रात दिली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पाच ग्रामपंचायतीसह भाजपने ४४ ग्रा.पं. मध्ये सरपंच उपसरपंच विराजमान झाले. असून आमदार होळी यांनी केलेल्या विकास कामावर विश्वास ठेवून महाविकास आघाडीला त्यांची जागा जनतेने दाखवून दिली, असल्याचे चलाख म्हणाले.