भाजप कार्यकर्त्यांनी टीम वर्कची जबाबदारी पेलावी
By admin | Published: July 10, 2016 01:02 AM2016-07-10T01:02:26+5:302016-07-10T01:02:26+5:30
गडचिरोली हा नेता तयार करणारा जिल्हा असून तिन्ही मतदार संघात भाजपने यश मिळविले. पक्ष कार्यकर्त्याच्या आधारे
हंसराज अहीर यांचे आवाहन : मार्र्कंडात तीन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षणाचा समारोप
चामोर्शी : गडचिरोली हा नेता तयार करणारा जिल्हा असून तिन्ही मतदार संघात भाजपने यश मिळविले. पक्ष कार्यकर्त्याच्या आधारे मार्गक्रमण करीत असते. कार्यकर्ता हाच पार्टीचा कणा असल्याने कार्यकर्त्यांनी नेतृत्वक्षम राहून भाजपच्या टीमवर्कची जबाबदारी खांद्यावर घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
पंडीत दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत वैनगंगेच्या तिरावर मार्र्कंडादेव येथे गुरूवारपासून सुरू झालेल्या भाजपच्या तीन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षणाचा समारोप शनिवारी झाला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी मंचावर भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस रवी भुसारी, जमालभाई सिध्दीकी, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, नाना नाकाडे, प्रकाश गेडाम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, प्रकाश अर्जुनवार, सत्यनारायण मंचार्लावार, डी. के. मेश्राम, अनिल पोहोणकर, रामेश्वर सेलुकर, डॉ. भारत खटी आदी उपस्थित होते. याप्रसंगी केंद्रीय गृहराज्यमंत्री झाल्याबद्दल नामदार हंसराज अहीर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर इयत्ता दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाशी खंबीरपणे पाठीशी राहून सरकारची उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचवावी. प्रशिक्षणार्थी कार्यकर्त्यांनी गावागावात भाजपचे संघटन मजबूत करावे, असे आवाहन नामदार अहीर यांनी यावेळी केले. यावेळी दिलीप चलाख, मनोज पालारपवार, नगरसेविका रोशनी वरघंटे, कविता किरमे, मिनल पालारपवार, प्रशांत येगलोपवार, विजय गेडाम, अविनाश महाजन, रवी बोमनवार, हरेश गांधी, आनंद गण्यारपवार, माणिक कोहळे, पं.स. उपसभापती मंदा दुधबावरे, वर्षा भांडेकर, आनंद भांडेकर, जयराम चलाख, नरेश अलसावार, निरज रामानुजवार, साईनाथ बुरांडे, ज्ञानेश्वर कुनघाकर, संतोष बुरांडे, भोगावार, वरगंटीवार आदी उपस्थित होते. ेसंचालन भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार यांनी केले तर आभार प्रशिक्षण सेलचे प्रमुख प्रशांत भृगुवार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)