आरमोरीत भाजपाचे चक्काजाम व जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:24 AM2021-06-27T04:24:15+5:302021-06-27T04:24:15+5:30

आरमोरी येथील स्थानिक इंदिरा गांधी चौकात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार कृष्णा गजबे यांनी शाहू महाराज ...

BJP's Chakkajam and jail-wide agitation in Armory | आरमोरीत भाजपाचे चक्काजाम व जेलभरो आंदोलन

आरमोरीत भाजपाचे चक्काजाम व जेलभरो आंदोलन

Next

आरमोरी येथील स्थानिक इंदिरा गांधी चौकात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार कृष्णा गजबे यांनी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आंदोलनाला सुरुवात केली. यानंतर सर्व भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आरमोरी- गडचिरोली रोडवर ओबीसींच्या न्याय हक्क मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन केले. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नारेबाजी करून सरकारचा निषेध करण्यात आला. भाजपच्या या आंदोलनामुळे आरमोरी-गडचिरोली मार्गावरील वाहतूक तब्बल अर्धा तास ठप्प पडलेली होती. आंदाेलकांना पाेलिसांनी स्थानबद्ध केले. काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चाेख पाेलीस बंदाेबस्त ठेवला हाेता.

हे चक्काजाम व जेलभरो आंदोलन आरमोरी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश पोरेड्डीवार यांच्या मार्गदर्शनात, आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात करण्यात आला. यावेळी नंदू पेट्टेवार, पंकज खरवडे, नगराध्यक्ष पवन नारनवरे, उपाध्यक्ष हैदरभाई पंजवांनी, ईश्वर पासेवार, पंचायत समिती सभापती नीता ढोरे, डॉ. संगीता रेवतकर, मनोज मने, भास्कर बोडणे, विलास पारधी, सुनीता चांदेवार, भारत बावनथडे, दीपक निंबेकर, गुरुनाथ ढोरे, लक्ष्मण कानतोडे, सुनील नंदनवार, मंगेश पासेवार, गोपाल भांडेकर, नगरसेविका सुनीता मने, गीता सेलोकर, विवेक खेवले, विजय गुरनुले, अक्षय हेमके, प्रसाद साळवे, गोविंदा भोयर, गंगाधर कुकडकर, अमर बोबाटे, युगल सामृतवार, जितेंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.

===Photopath===

260621\img-20210626-wa0052.jpg

===Caption===

ओबीसींच्या आरक्षणासाठी आरमोरी येथे भाजपच्या चक्काजाम आंदोलनात उपस्थित आ. कृष्णा गजबे व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते

Web Title: BJP's Chakkajam and jail-wide agitation in Armory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.