ओबीसी आरक्षणाबद्दलच्या पापात भाजपचाच वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:41 PM2019-04-08T23:41:28+5:302019-04-08T23:41:42+5:30

जिल्ह्यातील घटलेले ओबीसींचे आरक्षण माझ्यामुळे पूर्ववत होऊ शकले नाही, हा खा.अशोक नेते यांचा आरोप चुकीचा असून या पापात भाजपचाही वाटा असल्याचा आरोप डॉ.नामदेव उसेंडी यांनी पत्रकार परिषदेत केला.

BJP's contribution to the scam for OBC reservation | ओबीसी आरक्षणाबद्दलच्या पापात भाजपचाच वाटा

ओबीसी आरक्षणाबद्दलच्या पापात भाजपचाच वाटा

Next
ठळक मुद्देउसेंडी यांचा पलटवार : केवळ काँग्रेसचा दोष नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील घटलेले ओबीसींचे आरक्षण माझ्यामुळे पूर्ववत होऊ शकले नाही, हा खा.अशोक नेते यांचा आरोप चुकीचा असून या पापात भाजपचाही वाटा असल्याचा आरोप डॉ.नामदेव उसेंडी यांनी पत्रकार परिषदेत केला.
रविवारी भाजपच्या प्रचारसभेत खा.अशोक नेते यांनी ओबीसी युवकांचे नोकरीतील आरक्षण यापूर्वीच वाढणार होते. पण त्याला तत्कालीन आमदार डॉ.उसेंडी यांनी विरोध केला, असा आरोप जाहीर भाषणातून केला होता. त्यावर डॉ.उसेंडी यांनी पत्रपरिषद घेतली.
काँग्रेस पक्ष व आपण नेहमीच आरक्षणाच्या बाजुने आहोत. १९९६-९७ मध्ये भाजप सरकारने सर्वप्रथम ओबीसींच्या आरक्षणाला हात लावला. १९ टक्क्यांवर असलेले आरक्षण ११ टक्के केले. त्यानंतर पुन्हा काँग्रेस आघाडी सरकारने आरक्षण कमी करून ११ वरून ६ टक्क्यांवर आणले. असे असताना केवळ काँग्रेसला दोषी ठरविणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

Web Title: BJP's contribution to the scam for OBC reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.