संसदेतील गोंधळाविरोधात भाजपाचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 10:14 PM2018-04-12T22:14:21+5:302018-04-12T22:14:21+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदेत गोंधळ घालून ती बंद पाडणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या विरोधात देशभरात भाजपतर्फे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. गडचिरोली येथेही भाजपा जिल्हाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते याच्या नेतृत्वात उपोषण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदेत गोंधळ घालून ती बंद पाडणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या विरोधात देशभरात भाजपतर्फे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. गडचिरोली येथेही भाजपा जिल्हाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते याच्या नेतृत्वात उपोषण करण्यात आले. डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी खासदारांना लिंबूपाणी पाजून आंदोलनाची सांगता करण्यात आली.
यावेळी खा. अशोक नेते यांनी मार्गदर्शन करताना काँग्रेस खासदारांवर जोरदार टीकास्त्र सोडले. संसदेत लोकांच्या हिताचे महत्वाचे निर्णय घेतले जातात. परंतु काँग्रेसच्या खासदारांनी गोंधळ घालून संसद महिनाभर बंद पाडली. संसद बंद राहिल्याने लोकहिताचे निर्णय होऊ शकले नाहीत. हे लोकशाहीविरोधी असून, अशा मंडळींना आगामी निवडणुकीत जनता माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. उपोषण आंदोलनात जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, माजी नगराध्यक्ष किसन नागदेवते, नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, नगराध्यक्ष योगीता पिपरे, जि.प. सदस्य रंजिता कोडापे, शिल्पा रॉय, नगरसेवक प्रमोद पिपरे, संजय मेश्राम, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालु दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, संगीता राऊत, प्रशांत वाघरे, रमेश भुरसे, डॉ.भारत खटी, रवींद्र ओल्लालवार, न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार, प्रकाश गेडाम, रियाज शेख, विलास गावंडे, राम लांजेवार, नगरसेविका रंजना गेडाम, नीता उंदिरवाडे, वर्षा बट्टे, अविनाश पाल, गजानन यनगंधलवार, डी. के. मेश्राम, प्रकाश अर्जुनवार, डेव्हीड बोगी, युवराज बोरकुटे हजर होते.