ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा जिल्हाभर रास्ता राेको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:24 AM2021-06-27T04:24:00+5:302021-06-27T04:24:00+5:30
सर्वप्रथम चाैकात सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. या सभेला खा.अशाेक नेते यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर १.३० वाजता ...
सर्वप्रथम चाैकात सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. या सभेला खा.अशाेक नेते यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर १.३० वाजता रास्ता राेको आंदाेलन करण्यात आले. जवळपास अर्धा तास आंदाेलन चालले. भाजप कार्यकर्त्यांनी चारही मार्ग अडविले. त्यामुळे चारही मार्गांवर वाहनांच्या माेठ्या रांगा लागल्या हाेत्या. आंदोलकांकडून महाविकास आघाडी सरकारविराेधात घाेषणा दिल्या जात हाेत्या. त्यानंतर त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.
या आंदाेलनात खा.अशाेक नेते, नगराध्यक्ष योगिता पिपरे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, रवींद्र ओल्लालवार, नगरसेवक प्रमोद पिपरे, गोविंद सारडा, डॉ.भारत खटी, रमेश भुरसे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश सदस्य रेखा डोळस, जि.प.च्या समाजकल्याण सभापती रंजिता कोडाप, आदिवासी मोर्चाच्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, न.प. उपाध्यक्ष अनिल कुणघाडकर, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश महाजन, गडचिरोली तालुकाध्यक्ष रामरतन गोहणे, श्रीकांत पतरंगे, विलास भांडेकर, तालुका महामंत्री दुर्गा काटवे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, विनोद देवोजवार आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. आंदाेलनादरम्यान काेणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ठाणेदार प्रमाेद बानबले यांच्या मार्गदर्शनात मोठा पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.
बाॅक्स
...तर आरक्षण कायम असते- खा.नेते
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला एम्पेरियल डाटा सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर १५ महिन्यांचा कालावधी लोटूनही राज्य सरकारने डाटा सादर केलेला नाही. त्यामुळे हे आरक्षण गमवावे लागले. सरकारला जागे करण्यासाठीच भारतीय जनता पार्टीच्या वतीने रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. ओबीसींच्या हक्काचे आरक्षण परत मिळाल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन यावेळी भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांनी केले.