भाजपतर्फे गडचिरोलीत विजयाचा जल्लोष
By admin | Published: March 12, 2017 01:58 AM2017-03-12T01:58:18+5:302017-03-12T01:58:18+5:30
उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तरांचल या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी घोषीत झाला.
निवडणुकांमध्ये यश : फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा
गडचिरोली : उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तरांचल या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी घोषीत झाला. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीला एकूण ४०३ जागांपैकी ३२५ जागा मिळाल्या. उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपला बहुमत मिळाल्याने गडचिरोली येथील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी चौकात फटाके फोडून तसेच पेढे वाटून आनंद साजरा केला.
यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहर अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, डॉ. भारत खटी, न.प.चे बांधकाम सभापती आनंद श्रुंगारपवार, नगरसेवक भुपेश कुळमेथे, प्रमोद पिपरे, प्रविण वाघरे, विनोद देवोजवार, भास्कर बुरे, शंभूविधी गेडाम, विकास राचेलवार, अनिल पोहोणकर, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, नगरसेवक मुक्तेश्वर काटवे, दत्तू माकोडे, श्याम वाढई, जनार्धन साखरे, सदानंद कुथे, दिलीप म्हस्के, रवी भांडेकर, राजेंद्र भुरसे, आदीसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातून खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयापर्यंत चामोर्शी मार्गे ढोल ताशांच्या गजरात रॅली काढली. भाजपच्या या विजयी रॅलीने इंदिरा गांधी चौक परिसर निनादून गेला होता.