रस्ता कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:24 AM2021-06-19T04:24:33+5:302021-06-19T04:24:33+5:30
याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना बुधवार १७ जून रोजी अहेरीच्या तहसीलदारामार्फत निवेदन पाठविले. निवेदनात म्हटले आहे की, विद्युत ...
याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना बुधवार १७ जून रोजी अहेरीच्या तहसीलदारामार्फत निवेदन पाठविले. निवेदनात म्हटले आहे की, विद्युत खांबसुद्धा रस्त्याच्या ठिकाणी आले असून रस्ता बांधकाम करण्याच्या आधी रस्त्याच्या कडेला किंवा बाजूला विद्युत खांब स्थापित करणे गरजेचे होते. रस्ता बांधकामासाठी खासगी जमीन अधिग्रहित करण्यात आली असून जमीनमालकांना बाजारभावाप्रमाणे मोबदला देण्याची मागणी केली आहे. संबंधित कंत्राटदार रस्त्याचे काम संथगतीने व मनमर्जीप्रमाणे करीत असल्याने व अहेरी नगर पंचायतीचेही दुर्लक्ष होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, तसेच कंत्राटदाराला देयके न देता नोंदणीकृत परवाना काळ्या यादीमध्ये टाकावेत, अशी मागणी केली आहे. निवेदन देताना शिवसेना अहेरी उप जिल्हाप्रमुख रियाज शेख, अहेरी विधानसभा प्रमुख अरुण धुर्वे, संघटक बिरजू गेडाम, प्रफुल्ल येरणे, शिवसेना महिला संघटिका तुळजा तलांडे, सपना इश्वरकर, दिलीप सुरपाम, अक्षय करपे, राजू येनगंटीवार, महेश मोहुर्ले आदी उपस्थित होते.
===Photopath===
160621\04504905img_20210616_163850.jpg
===Caption===
अहेरी राजनगरीतील आझाद चौक ते दानशूर चौक च मार्ग पावसात माखलेला