गृहराज्यमंत्र्यांचे ठणकावणे पोलिसांचे मनोबल वाढविणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:14 AM2017-12-17T01:14:27+5:302017-12-17T01:15:15+5:30

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर गेल्या ९ डिसेंबरला प्रथमच चामोर्शी शहरात आले. जि.प. केंद्र शाळेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणातही नक्षली कारवायांच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांना उद्देशून सूचक विधान केले.

Blasting the House Minister enhances police morale | गृहराज्यमंत्र्यांचे ठणकावणे पोलिसांचे मनोबल वाढविणारे

गृहराज्यमंत्र्यांचे ठणकावणे पोलिसांचे मनोबल वाढविणारे

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर गेल्या ९ डिसेंबरला प्रथमच चामोर्शी शहरात आले.

रत्नाकर बोमीडवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर गेल्या ९ डिसेंबरला प्रथमच चामोर्शी शहरात आले. जि.प. केंद्र शाळेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणातही नक्षली कारवायांच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांना उद्देशून सूचक विधान केले. शस्त्रे खाली ठेऊन शरण या, चर्चा करा असे आवाहन करतानाच प्रेमाने समजत नसेल तर वठणीवर आणण्यासाठी सुरक्षा दल सक्षम आहे, असा सज्जड इशाराच त्यांनी दिला. गेल्या महिनाभरात वाढलेल्या नक्षल कारवायांनी पोलिसांचे टेन्शन वाढविले असताना गृहराज्यमंत्र्यांचे हे ठणकावून सांगणे पोलिसांचे मनोबर वाढविणारे ठरले आहे.
संपूर्ण राज्यात नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून नक्षल समस्या हद्दपार करण्यासाठी सुरक्षा दलांना जीवाचे रान करावे लागत आहे. पण अनेक वेळा नक्षल्यांच्या हिंसक कृत्यामुळे पोलिसांचे मनोबल खचते. तरीही अलिकडच्या काही वर्षात नक्षली कारवाया बºयाच प्रमाणेत नियंत्रणात आल्या आहेत. पोलिसांच्या आत्मसमर्पण योजनेलाही बरेच यश येत आहे. भरकटलेल्या नक्षलवाल्यांना आत्मसमर्पणातूनच योग्य मार्ग मिळू शकतो हे गृहराज्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सांगितले. विघातक कारवाया करणारे आपले शत्रू नसून त्यांनाही आपल्या मागण्या व विचार मांडण्याचा अधिकार आहे. पण त्यासाठी आधी शस्त्रे खाली ठेवावी व लोकशाही मार्गाने चर्चा करण्यासाठी शासनासमोर यावे, हा ना.अहीर यांचा सल्ला मोलाचा आहे.
ज्या केंद्र शाळेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने ना.अहीर चामोर्शीत आले त्या कार्यक्रमाच्या उद्घाटन पत्रिकेत जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षण सचिव, उपसचिव, शिक्षण संचालक, उपसंचालक, प्राथमिक शिक्षणाधिकारी अशा प्रशासकीय अधिकाºयांचीही नावे होती. पण केंद्रीय मंत्री आले असतानाही यापैकी कोणत्याही अधिकाºयाने या कार्यक्रमाला येण्याचे सौजन्य दाखवून नये, ही बाब ना.अहीर यांनाही खटकणारी होती. जाहीर भाषणात यावरून त्यांनी त्या अधिकाºयांना धारेवर धरले. शताब्दी महोत्सवाला राजकीय वळण देण्याचाही प्रयत्न झाला. परंतु आयोजकांच्या कल्पकतेमुळे सामोपचाराने सर्व कार्यक्रम पार पडले.
एखाद्या शाळेने किंवा संस्थेने १०० वर्ष पूर्ण करणे ही बाब त्या संस्थेला नक्कीच गौरवास्पद आहे. त्याहुनही शताब्दी कार्यक्रमास केंद्रीय मंत्री लाभणे निश्चितच उल्लेखनीय आहे. प्रत्येक कार्यक्रमाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहणे ही सध्या सर्वांची सवयच झाली आहे. कितीतरी मुलांच्या शिक्षणाची व त्यांच्या भवितव्याची सकारात्मक चर्चा होणे व शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणणे हे देखील आवश्यक आहे. परंतु पक्षांच्या राजकारणात आकंठ बुडालेल्या वर्तमान राजकीय नेत्यांना हे समजेल तोच सुदिन म्हणावा लागेल!

Web Title: Blasting the House Minister enhances police morale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.