दीक्षा समारंभाच्या स्मृतींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 11:57 PM2017-10-15T23:57:36+5:302017-10-15T23:57:59+5:30

येथील दीक्षा भूमीवर हजारोच्या संख्येत धम्मचक्र प्रवर्तन दिनाला जनसागर उसळला. सम्राट अशोकानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्थात लाखो अनुयायांसमवेत बौद्ध धम्माची दीक्षा घेणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महापुरूष ठरले.

Bless the memory of the initiation ceremony | दीक्षा समारंभाच्या स्मृतींना उजाळा

दीक्षा समारंभाच्या स्मृतींना उजाळा

Next
ठळक मुद्देदेसाईगंजात उसळला जनसागर : कार्यक्रमात वक्त्यांनी आठवणी जागविल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : येथील दीक्षा भूमीवर हजारोच्या संख्येत धम्मचक्र प्रवर्तन दिनाला जनसागर उसळला. सम्राट अशोकानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्थात लाखो अनुयायांसमवेत बौद्ध धम्माची दीक्षा घेणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महापुरूष ठरले. त्यांनी त्यांनी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यानंतर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी देसाईगंज येथे लाखो अनुयायांना दीक्षा दिली. तेव्हापासून देसाईगंज येथील दीक्षाभूमी नावारूपास आली. अशा अनेक आठवणी जागवित वक्त्यांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला.
देसाईगंज येथील दीक्षाभूमीत शनिवारी आयोजित धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्या निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी पंचरंगी धम्म ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर बौद्ध वंदना घेण्यात आली. सायंकाळी विविध वॉर्डातून धम्म रॅली फिरविण्यात आली. त्यानंतर भंते कुणाल कीर्ती यांच्या अध्यक्षतेखाली बुद्धवंदना पार पडली. या कार्यक्रमानंतर ग्यानचंद जांभुळकर यांचा सामाजिक प्रबोधन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी भंते कुणाल कीर्ती होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष शालू दंडवते, डॉ. महेश पापडकर, इंजि. विजय मेश्राम, उद्धव खोब्रागडे उपस्थित होते.
बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीमुळे देशातीलच नव्हे तर जगातील शोषितांना न्याय मिळाला, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले. देसाईगंज शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून विकासकामे करताना दीक्षाभूमीलाही महत्त्व दिले जाईल, असे मनोगत शालू दंडवते यांनी व्यक्त केले. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन सहसचिव जयश्री लांजेवार यांनी केले. तर आभार महिला समितीच्या सचिव ममता जांभुळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक सम्यक जागृत बौद्ध महिला समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले. या सोहळ्याला देसाईगंज तालुक्यातील शेकडो बौद्ध समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: Bless the memory of the initiation ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.