गडचिरोलीतील ६७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:00 AM2020-04-02T05:00:00+5:302020-04-02T05:00:35+5:30
आरोग्यमंत्र्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक दायित्व निभावत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ६७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशिष्ट अंतराचे भान राखत स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यात कोविड-१९ (कोरोना) साथीच्या रोगाच्या फैलावामुळे राज्यातील रक्तपेढींमधील रक्तसाठा कमी होत आहे. आरोग्यमंत्र्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक दायित्व निभावत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ६७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशिष्ट अंतराचे भान राखत स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. रक्तदात्यांसाठी सर्व प्रकारची सोय करण्यात आली होती. यावेळी गोळा झालेल्या ६७ बॅग रक्त जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत जमा करण्यात आले. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी रक्तदात्यांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून दिलेल्या या प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.