३१ कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:00 AM2020-04-11T05:00:00+5:302020-04-11T05:01:17+5:30
कोरोनाचा संसर्ग वाढल्यास रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शिक्षक समिती संघटना चामोर्शीच्या पुढाकाराने ९ एप्रिल रोजी सहकारी पतसंस्था चामोर्शीच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात ३१ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : कोरोनाचा संसर्ग वाढल्यास रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शिक्षक समिती संघटना चामोर्शीच्या पुढाकाराने ९ एप्रिल रोजी सहकारी पतसंस्था चामोर्शीच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात ३१ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
रक्त संकलन करण्याकरिता डॉक्टर शेषराव भैसारे यांच्या नेतृत्वात रक्तपेढीचे पीआरओ सतीश तडकलावार, टेक्निशियन नरेश कंदुकुरीवार, स्वप्नील चापले, मुरलीधर पेद्दीवार, प्रमोद देशमुख, कुशल कवठेकर, संदीप चलाख यांनी रक्त संकलन करण्यास मदत केली. यावेळी सुनील खोब्रागडे, अक्षय सद्दलवार, मदन आभारे, प्रा.महेंद्र बुर्लावार, राजेश्वर मडावी, संजय लोणारे, गिरीधर सावाकडे, अशोक सहारे, सादू लेकामी, मोरेश्वर भैसारे, मिलींद धायवट, संदीप बारसागडे, संदीप लिंगे, संदीप शेळके, संतोष गुट्टे, रोहित नैताम, संजय खाडे, संजय गायकवाड, विनोद चिटलोेजवार, किशोर आत्राम, विलास मांडवे, सुधाकर गायकवाड, भूषण चेल्लेरवार, रोहित मस्के, इतेंद्र चांदेकर, घनश्याम भेंडारे, किशोर कापगते, नोमेश्वर उरकुडे, गेमेश्वर बदकल, देवाजी तिम्मा, विनोद डोंगरवार यांनी रक्तदान केले.
आणची ३५ जणांनी रक्तदानाचे अर्ज भरून दिले आहेत. रुग्णालयात ‘ओ’ व ‘ए’ पॉझिटीव्ह रक्ताचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या गटाच्या रक्तदात्यांचे रक्त पुढील महिन्यात घेतले जाणार आहे.