रक्तदान शिबिरात ३१ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:39 AM2021-05-11T04:39:02+5:302021-05-11T04:39:02+5:30
गडचिरोली जिल्हा शिक्षक भारती अनुदानित आश्रमशाळा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष महेश बोरेवार, मार्गदर्शक राजू कात्रटवार, अनिल सहारे, सुधीर ...
गडचिरोली जिल्हा शिक्षक भारती अनुदानित आश्रमशाळा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष महेश बोरेवार, मार्गदर्शक राजू कात्रटवार, अनिल सहारे, सुधीर झंझाळ, नितीन चेंबूलवर यांनी संघटनेच्या सदस्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले हाेते. रक्तदानासाठी ३५ कर्मचाऱ्यांनी नाेंदणी केली हाेती; परंतु बहुतेक जणांनी कोविड लसीकरणाचा पहिला डोस घेतल्याने डॉक्टरांनी त्यांचे रक्त घेण्यास असमर्थता दर्शवली. ऐनवेळी चांदाळा येथील ग्रामस्थ व अनुदानित माध्यमिक आश्रम शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान केले. विनोद जेंगठे, सुभाष किरंगे, सूरज कोवे, सरगम गावळे, प्रशांत सिडाम, साहिल तुमरेटी, सूरज उसेंडी, अंकुश दुगा, रोशन दर्राे, सचिन तुमरेटी, नितेश वेस्कडे, बादल वेस्कडे, रमेश वेस्कडे, विकास कोवे आदी युवकांसह शिक्षक भारती अनुदानित आश्रमशाळा संघटनेच्या सदस्यांनी रक्तदान केले. रक्तसंकलनाचे काम डॉ. वनिता साखरे, सतीश तडकलावार व संघटनेचे सदस्य नितीन चेंबूलवार, रवींद्र अलोने, खुशाल पटले, शैलेश भैसारे, धनराज चुधरी, ए. एम.नरुले, जगजीवन सेलोकर, मनोज सोमनकार, गुरुदेव गोरटेकर, हिवराज कोहपरे यांनी सहकार्य केले.
===Photopath===
100521\10gad_2_10052021_30.jpg
===Caption===
रक्तदान केल्यानंतर प्रमाणपत्र दाखविताना कर्मचारी व युवक.