आरमाेरी येथे ४८ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:28 AM2020-12-26T04:28:45+5:302020-12-26T04:28:45+5:30
आरमाेरी : येथे महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न.पं. वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा याेजना विभागाच्या वतीने तसेच पाेलीस ...
आरमाेरी : येथे महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न.पं. वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा याेजना विभागाच्या वतीने तसेच पाेलीस ठाण्यात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या दाेन्ही शिबिरात एकूण ४८ जणांनी रक्तदान केले.
महात्मा गांधी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा याेजना विभागाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण २६ जणांनी रक्तदान केले. शिबिरासाठी ४१ विद्यार्थी व शिक्षकांची नाेंद करण्यात आली हाेती. परंतु प्रत्यक्ष २६ जणांनी रक्तदान केले. प्राचार्य डाॅ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डाॅ. अंजली साखरे यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. तर प्रा. डाॅ. ज्ञानेश्वर ठाकरे, डाॅ. सी.डी. मुंगमाेडे, डाॅ. विजय गाेरडे, डाॅ. वसंता कहालकर यांनी रक्तदान करुन रक्तदानाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे संचाल प्रा. सीमा नागदेवे यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा. डाॅ. जयेश पापडकर, प्रा. शशिकांत गेडाम, प्रा. नाेमेश मेश्राम, प्रा. पराग मेश्राम, डाॅ. विजय गाेरडे, डाॅ. मनाेज ठवरे, प्रा. दिलीप घाेनमाेडे, हिरालाल मगरे, सचिन ठाकरे यांनी सहकार्य केले.
आरमाेरी पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात २२ जणांनी रक्तदान केले. जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबिर घेण्यात आले. या उपक्रमाला पाेलीस जवानांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी पाेलीस निरीक्षक दिगांबर सूर्यवंशी, सहायक पाेलीस निरीक्षक पंकज बाेंडसे, चेतनसिंग चौहान, पाेलीस उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे, कांचन उईके आदी कर्मचारी उपस्थित होते.