५० एसआरपीएफ जवानांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:38 AM2021-05-19T04:38:12+5:302021-05-19T04:38:12+5:30
तालुका मुख्यालयापासुन दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विसोरा नजीकच्या एसआरपीएफ कॅम्पच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५० एसआरपीएफ अधिकारी व ...
तालुका मुख्यालयापासुन दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विसोरा नजीकच्या एसआरपीएफ कॅम्पच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५० एसआरपीएफ अधिकारी व जवानांनी रक्तदान केले.
राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक-१३ च्या वतीने आयोजीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन समादेशक डाॅ.पवन बन्सोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहायक समादेशक डी. एस. जांभुळकर, पोलीस निरीक्षक पि.डी.उईके, पोलिस निरीक्षक ए.एन.रुपनाराण, पोलीस उपनिरीक्षक पवन मिश्रा, रामटेके आदी उपस्थित होते.
देशामध्ये तसेच राज्यामध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सद्या सर्वत्र रक्ताची गरज भासत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक-१३ च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक-१३ च्या आस्थापनेवरील एकुण ५० अधिकारी व अंमलदार यांनी रक्तदान केले. पोलीस अंमलदारांनी प्लाझ्मा दान केले. संचालन पोलीस निरीक्षक ए.एन. रुपनाराण यांनी तर आभार पोलीस उपनिरीक्षक पवन मिश्रा यांनी मानले.