बुद्ध जयंतीनिमित्त गडचिरोलीत ७५ वन कर्मचाऱ्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 05:00 AM2020-05-08T05:00:00+5:302020-05-08T05:01:12+5:30
कोरोना विषाणूची साथ सर्वत्र वाढत असल्याने या साथीला आटोक्यात आणताना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासणार आहे. अनेक रूग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. ही बाब लक्षात घेऊन असोसिएशन आॅफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज गडचिरोलीच्या वतीने नागपूरचे वनाधिकारी डॉ.किशोर मेश्राम (भा.व.से.) यांच्या मार्गदर्शनात ७ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बुद्ध जयंतीचे औचित्य साधून असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज गडचिरोलीच्या वतीने वन विभागाच्या विश्रामगृहात गुरूवारी (७) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ७५ वन कर्मचारी व अधिकाऱ्यांनी रक्तदान केले.
कोरोना विषाणूची साथ सर्वत्र वाढत असल्याने या साथीला आटोक्यात आणताना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासणार आहे. अनेक रूग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. ही बाब लक्षात घेऊन असोसिएशन आॅफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज गडचिरोलीच्या वतीने नागपूरचे वनाधिकारी डॉ.किशोर मेश्राम (भा.व.से.) यांच्या मार्गदर्शनात ७ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
गडचिरोलीचे उपवनसंरक्षक डॉ.शि. र. कुमारस्वामी यांच्या रक्तदानाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी सहायक वनसंरक्षक सोनल भडके, मिथून राऊत, पंडीत राठोड, युवराज मेश्राम, कमलेश भगत, भारत अल्लीवार, रूपेश मेश्राम, उमेश बोरावार, धिरज ढेंबरे, विजय घोडबे, गिरीधर बांते, निखिल पवार, डिकेश ढोलणे, राजेश दुर्गे, संदीप रामटेके, पंकज बोंदरे, पवन शातलवार, नितीन जाधव, भोजराज गुरनुले, प्रशांत चौधरी, ताराचंद म्हशाखेत्री, नितेश सोमनकर, अभय देवगडे, गिरीधर रायपुरे, अमित करमनकर, संदिप आंबेडोरे, धम्मदिप लोणारे, नांगसु गोटा, अब्दूल कुरेशी, अरूण जाबोर, गुरूनाथ वाढई, कुणाल निमगडे, विकास लटारे, नितीन कावडकर, रमेश बारसागडे, पंकज फाले, युवराज मडावी, समीक्षित मुचेलवार, शुभम खरवडे, अमीत ढेंगरे, सतीश दुर्गमवार, गिरीधर कोडाप, तुषार बोडके, मनोजकुमार शिंदे, विनोद कुनघाडकर, शेखर दातार, अजीतसिंग राठोड, प्रमोद गेडाम, दिवाकर पोरतेट, राकेश तांबे, नितीन हेमके, अमोल आकनुरवार, पंकज फरकाडे, राहुल मेश्राम, गुरूदास टेकाम, भास्कर ढोणे, विकास कुमरे, देवेंद्र मेश्राम, अंजली बोरावार, राजकुमार हरीदास बन्सोड, भारत म्हशाखेत्री, संजय राठोड, राजेश सूर्यवंशी, धनश्री दिकोंडवार, देवेंद्र दिकोंडवार, महेंद्र गावंडे, धर्मराव दुर्गमवार, सिध्दार्थ मेश्राम, विजय कोडापे, राजेश नेरकर, जानवी नेरकर, विनोद धात्रक, नितीन ढवळे, दशरथ शेंडे यांनी रक्तदान केले.
विभागीय वनाधिकारी एस. एल. बिलोलीकर यांनी रक्तदान शिबिराला भेट दिली. संघटनेच्या वतीने गरजू नागरिकांना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले.
रक्तदात्यांना दुपट्टा देऊन सन्मानित करण्यात आले. उमेश बोरावार व सी. एस. तोंबर्लावार यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली. किशोर सोनटक्के यांनी रक्तदात्यांसाठी बिस्किट उपलब्ध करून दिले. शिबिरादरम्यान जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्तपेढीचे कर्मचारी हजर होते.