आरमोरीत आज रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:23 AM2021-07-05T04:23:30+5:302021-07-05T04:23:30+5:30
यावेळी नर्सिंग स्कूलचे संस्थाध्यक्ष सुधाकर साळवे आरमोरी नगरपालिकेचे गटनेते सुदाम मोटवानी, आरोग्य सभापती भरत बावनथडे, नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष ...
यावेळी नर्सिंग स्कूलचे संस्थाध्यक्ष सुधाकर साळवे आरमोरी नगरपालिकेचे गटनेते सुदाम मोटवानी, आरोग्य सभापती भरत बावनथडे, नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष मन्नू मोटवानी, सामाजिक कार्यकर्ते चिनी मोटवानी, पं.स.चे माजी उपसभापती चंदू वडपल्लीवार हे अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
या शिबिराच्या आयोजनात नवदुर्गा उत्सव मंडळ, लोकमत सखी मंच शाखा आरमोरी यांचाही सक्रिय सहभाग आहे. शिबिरातून संकलित रक्ताद्वारे जिल्ह्यातील रुग्णांच्या रक्ताची गरज भागविली जाणार आहे. या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ.गणेश जैन, जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, सखी मंच जिल्हा संयोजिका रश्मी आखाडे, लोकमतचे तालुका प्रतिनिधी विलास चिलबुले, शहर प्रतिनिधी महेंद्र रामटेके, सखी मंच तालुका संयोजिका सुनीता तागवान यांनी केले आहे.
(बॉक्स)
कोरोनामधून बरे झालेले आणि लस घेणारेही करू शकतील रक्तदान
ज्यांना कोरोना झाला होता आणि त्यातून जे बरे झाले, त्यांना सुट्टी झाल्यापासून २८ दिवसांनंतर रक्तदान करता येते. रक्तदात्यास त्या २८ दिवसांमध्ये खोकला, सर्दी व ताप यांची लक्षणे नसावीत. याशिवाय लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेणाऱ्यांना १४ दिवसांनी रक्तदान करता येते, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांना रक्तदान करण्याची संधी आहे.
(बॉक्स)
उद्या चामोर्शी येथे आयोजन
चामोर्शी येथे लोकमत वृत्तपत्र समूहाच्या पुढाकाराने ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता ग्रामीण रुग्णालय येथे रक्तदान शिबिर होणार आहे. या शिबिरात लोकमत सखी मंच, होप फाउंडेशन, अनेक गणेश व दुर्गा उत्सव मंडळांसह पोलीस विभागाचा सहभाग राहणार आहे. या शिबिरासाठी लोकमतचे तालुका प्रतिनिधी रत्नाकर बोमिडवार, शहर प्रतिनिधी लोमेश बुरांडे, सखी मंचच्या तालुका संयोजिका सोनाली आकाश पालारपवार आणि होप फाउंडेशनचे नागेश मादेशी हे परिश्रम घेत आहेत.