बोलेरोची बसला धडक

By admin | Published: May 22, 2017 01:29 AM2017-05-22T01:29:43+5:302017-05-22T01:29:43+5:30

आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील उमानूर गावापासून एक किमी अंतरावर बेजुरपल्लीवरून जिमलगट्टा येथील

Bolero's bus fell | बोलेरोची बसला धडक

बोलेरोची बसला धडक

Next

उमानूरजवळील घटना : एक ठार, एक गंभीर, सात प्रवासी जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील उमानूर गावापासून एक किमी अंतरावर बेजुरपल्लीवरून जिमलगट्टा येथील आठवडी बाजारासाठी प्रवासी घेऊन येत असलेल्या बोलेरो वाहनाने उभ्या बसला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अन्य सात प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. मृतक इसम बेजुरपल्ली येथील उपसरपंच आहे. सदर घटना रविवारी दुपारी सकाळी ११ ते १२ वाजताच्या सुमारास घडली.
पोचा कुले गावडे (४५) असे मृतकाचे नाव असून ते बेजुरपल्ली येथील उपसरपंच होते. राजेश रोशन दुर्गे (३७) रा. मरपल्ली हा गंभीर जखमी आहे. तर किरकोळ जखमींमध्ये लक्ष्मी ढुरके (५०) रा. बेजुरपल्ली, लक्ष्मी इरपा मडे, सोनी बका वेलादी (२२), सिरीया पेंटा वेलादी (२५), शंकर दुरार्पा अटेला (४५), कुले रामा वेलादी (५०), तुंगी व्यंकटेश मडावी सर्व रा. बेजुरपल्ली यांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार बोलेरो वाहन क्रमांक एमएच ३३ जी १३२९ ने बेजुरपल्ली येथून काही नागरिक जिमलगट्टा येथील आठवडी बाजारासाठी येत होते. दरम्यान उमानूरपासून एक किमी अंतरावर एमएच ४० एक्यू ६०७१ क्रमांकाची बस उभी होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाची बसला मागून जबर धडक बसली. यामध्ये एक जण जागीच ठार झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या वाहनात २५ ते ३० प्रवासी बसले होते. जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांढरे, सिरोंचा येथील १०८ रूग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयस्वाल, आष्टी येथील डॉ. कटरे यांनी १०८ च्या रूग्णवाहिकेने घटनास्थळी दाखल होऊन उपचार केले. घटनास्थळावर पाहणाऱ्या नागरिकांची गर्दी झाली होती.

अपघातांची
मालिका सुरूच
४मागिल काही दिवसांपासून आलापल्ली-सिरोंचा मार्गावर अपघातांची मालिका सुरू असून अनेकांनी प्राण गमावले आहे. मागिल काही दिवसांपूर्वी याच मार्गावर एका महिंद्रा मॅक्स आणि टकची धडक होवून ६ जण ठार झाले होते. तसेच उमानूर पहाडीवर तेंदूपत्ता मजूरांना घेवून जाणारी टॅव्हल्स व ट्रक उलटून अनेकजण जखमी झाले.

Web Title: Bolero's bus fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.