सुरसुंडी भागातील बंधारे झाले निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:03 AM2018-03-06T00:03:51+5:302018-03-06T00:03:51+5:30

धानोरा तालुक्यातील सुरसुंडी-खांबाडा या मार्गावरील नदीवर चार वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाच्या वतीने सिंचन सुविधेच्या निर्मितीसाठी दोन बंधारे बांधले होते.

Bonds stuck in Sursundi area | सुरसुंडी भागातील बंधारे झाले निकामी

सुरसुंडी भागातील बंधारे झाले निकामी

googlenewsNext
ठळक मुद्देलाखोंचा खर्च व्यर्थ : शेतकरी सिंचन सुविधेपासून वंचित; प्रशासनाचे नियोजन ढासळले

आॅनलाईन लोकमत
सुरसुंडी : धानोरा तालुक्यातील सुरसुंडी-खांबाडा या मार्गावरील नदीवर चार वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाच्या वतीने सिंचन सुविधेच्या निर्मितीसाठी दोन बंधारे बांधले होते. मात्र सद्य:स्थितीत या बंधाऱ्याचे दरवाजे बेपत्ता झाल्याने दोन्ही बंधारे कुचकामी ठरले आहेत.
धानोरा तालुक्यातील सुरसुंडी, इरूपटोला, शिवटोला व सायगाव या परिसरातील अनेक शेतकरी दवर्षी मक्का व भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. गावालगतच सुरसुंडी-खांबाडा मार्गावर नदी असल्याने शेकडो शेतकरी या नदीच्या पाण्यावर अवलंबून असतात. त्यामुळे शासनाने गडचिरोली जिल्ह्याच्या सुरसुंडी भागात सिंचन सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला. त्याअनुषंगाने पाटबंधारे विभागामार्फत दोन बंधारे मंजूर करण्यात आले. विभागाच्या वतीने निविदा प्रक्रिया राबवून खासगी कंत्राटदारामार्फत बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र या बंधाऱ्याचा काहीही उपयोग परिसरातील शेतकऱ्यांना आजवर झाला नाही. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे या भागातील शेतकरी सिंचन सुविधेपासून वंचित राहिले आहेत. परिणामी शासनाचे लाखो रूपये व्यर्थ खर्च झाले.
मागील खरीप हंगामात पुरेशा पावसाअभावी धानपीक करपले. तसेच आता खरीप हंगामात शेत जमिनीत ओलावा नसल्याने भाजीपाला पिकाला पाण्याची गरज आहे. मात्र नदीत बांधण्यात आलेल्या बंधाºयाचे दरवाजेच शिल्लक न उरल्याने पावसाळ्यातील पाणी निघून गेले. बंधारा बांधूनही येथे पाणी साचून न राहिल्याने रब्बी हंगामातील पिकांनाही या बंधाºयाचा उपयोग झाला नाही. एकूण शासनाच्या वतीने लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले बंधारे निरूपयोगी ठरले आहेत. शासनाच्या संबंधित विभागाने तत्काळ या बाबीकडे लक्ष देऊन सुरसुंडी-खांबाडा मार्गावरील नदीवर बांधण्यात आलेल्या दोन्ही बंधाºयांना दरवाजे बसवावेत, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Bonds stuck in Sursundi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.