डिजीटल वर्गासह पुस्तकही पहिल्याच दिवशी मिळालेमार्र्कं डादेव येथील कार्यक्रम : आमदार, जिल्हाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
By admin | Published: June 29, 2016 01:30 AM2016-06-29T01:30:41+5:302016-06-29T01:30:41+5:30
चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव आश्रमशाळेला आ. डॉ. देवराव होळी भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
गडचिरोली/चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव आश्रमशाळेला आ. डॉ. देवराव होळी भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तर गडचिरोली येथील इंग्रजी माध्यमाच्या ८ डिजीटल वर्गखोल्यांचा शुभारंभ जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या हस्ते करण्यात आला. हा दुहेरी योग होता..
गडचिरोली येथील चामोर्शी बायपास मार्गावर इंग्रजी माध्यमाची शाळा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली यांच्या मार्फत चालविली जाते. या शाळेला पहिल्याच दिवशी सोमवारी जिल्हाधिकारी ए.एस.आर नायक यांनी भेट दिली व तेथील सर्व बाबींची पाहणी केली. या शाळेत डिजीटल वर्गाची संकल्पना साकारण्यात आली आहे. विद्याथ्यांसोबत संवाद साधून अडचणी जाणल्या . जिल्हाधिकाऱ्यांसमावेत आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकरही उपस्थित होते.
पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सोमवारी पहिल्याच दिवशी पुस्तके देखील वर्गात देण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
डिजीटल क्लास रूमसाठी उपलब्ध साधनसुविधांची जोड देऊन केवळ १० हजार रूपयांत एक अशा पद्धतीने कमीतकमी खर्चात ती क्लासरूम साकारण्यात आली आहे. या माध्यमातून नव्या तंत्राचा परिचय होण्यासोबतच विद्यार्थ्यांना इंटरनेटचाही वापर येणाऱ्या काळात अभ्यासासाठी करता येईल.
- कौस्तुभ दिवेगावकर, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली