नाडवाही नाल्यावरील दोन्ही बंधारे कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:54 PM2018-10-14T23:54:10+5:302018-10-14T23:55:18+5:30
आरमोरी तालुक्यातील वडेगाव, मेंढा व परिसरातील शेतजमिनीला सिंचनाची सोय व्हावी, यासाठी नाडीवाही नाल्यावर पाच वर्षांपूर्वी दोन मोठे सिमेंट काँक्रीटचे बंधारे बांधण्यात आले. मात्र सद्य:स्थितीत या बंधाºयात पाण्याची साठवण झाली नसल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : आरमोरी तालुक्यातील वडेगाव, मेंढा व परिसरातील शेतजमिनीला सिंचनाची सोय व्हावी, यासाठी नाडीवाही नाल्यावर पाच वर्षांपूर्वी दोन मोठे सिमेंट काँक्रीटचे बंधारे बांधण्यात आले. मात्र सद्य:स्थितीत या बंधाºयात पाण्याची साठवण झाली नसल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे शेतकरी अंतिम टप्प्यात असलेल्या आपल्या शेतजमिनीतील धान पिकाला वाचविण्यासाठी धडपड करीत आहे. परिणामी नाडवाही नाल्यावरील दोन्ही बंधारे कुचकामी ठरले असून यावरील लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
नाडवाही नदीवजा नाला असून हा नाला असून परिसरातील शेतकºयांसाठी वरदान ठरणारा आहे. पावसाचे पाणी वाहून न जाता पाण्याची साठवण व्हावी, यासाठी मेंढा, झेंडेपार गावादरम्यान नाडवाही नाल्याच्या पुलावरील वरच्या बाजूस लाखो रूपये खर्च करून दोन सिमेंट काँक्रीट बंधारे बांधण्यात आले. मात्र या दोन्ही बंधाºयात सध्या पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे या बंधाºयावरील लाखो रूपयांचा खर्च व्यर्थ गेला आहे. जिल्हा परिषद सिंचाई उपविभाग वडसा यांच्यामार्फत बांधण्यात आलेल्या या साठवण बंधाºयावरील लोखंडी पत्रे गायब झाली आहेत. तर काही पत्रे इतर पत्रे पडलेले आहे. सिंचन उपविभागामार्फत बंधाºयाचे काम पूर्ण झाल्यानंतर या बंधाºयाच्या देखभालीकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले. अधिकारी व राजकीय पदाधिकाºयांचेही या समस्येकडे कायम दुर्लक्ष झाले. त्यामुळे आता मागील महिन्यापासून पाऊस न झाल्याने कमी मुदतीच्या धान पिकाला धोका निर्माण झाला आहे. लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या बंधाºयातून एक हेक्टर क्षेत्राला सिंचन व्यवस्था होत नसल्याने शेतकºयांचे हातात येणारे पीक नष्ट होणार आहे.