दोघांना मिळाला एकच आधार क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 06:00 AM2020-01-08T06:00:00+5:302020-01-08T06:00:18+5:30
दागो राजगडे यांनी आधार कार्ड काढण्याची मोहीम सुरू झाली, तेव्हाच आधार कार्ड काढला. सर्वच ठिकाणी राजगडे यांनी आधार कार्ड दिला. गोरगरीबांच्या योजनांचा त्यांना लाभ मिळत होता. किन्हाळा ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया हंसराज नानाजी लोखंडे यांनी आधार कार्ड काढला. लोखंडे यांना राजगडे यांचा आधार क्रमांक देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा येथील दागो भिका राजगडे व मोहटोला येथील हंसराज नानाजी लोखंडे यांना एकाच क्रमांकाचा आधार कार्ड मिळाला आहे. विशेष म्हणजे, दागो राजगडे यांच्या नावाच्या योजनांचे पैसे लोखंडे यांच्या खात्यात जमा होत असल्याने राजगडे यांची अडचण वाढली आहे.
दागो राजगडे यांनी आधार कार्ड काढण्याची मोहीम सुरू झाली, तेव्हाच आधार कार्ड काढला. सर्वच ठिकाणी राजगडे यांनी आधार कार्ड दिला. गोरगरीबांच्या योजनांचा त्यांना लाभ मिळत होता. किन्हाळा ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया हंसराज नानाजी लोखंडे यांनी आधार कार्ड काढला. लोखंडे यांना राजगडे यांचा आधार क्रमांक देण्यात आला. त्यामुळे लोखंडे व राजगडे या दोघांचेही आधार क्रमांक सारखे झाले. त्यानंतर रोजगार हमी योजना, गॅस सबसिडी, बँक खात्यात जमा होणारे इतर योजनांचे पैसे लोखंडे यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरूवात केली. राजगडे यांना शंका आल्याने त्यांनी याबाबत विचारणा केली असता, लोखंडे व आपला आधार क्रमांक ७८५८६११९१२०८ हा सारखाच असल्याचे लक्षात आले. तसेच दागो यांच्या आधार कार्डावर हंसराज लोखंडे यांचा फोटो अपलोड झाला. प्रत्येक योजनेसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. अशा स्थितीत राजगडे यांचा आधार कार्ड दोषपूर्ण असल्याने त्यांना अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आधार कार्डासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमला आहे. त्यांनी योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
कार्यालयांच्या चकरा मारून थकले राजगडे
आधार कार्ड हा त्या व्यक्तीची ओळख दर्शविणारा प्रमाणपत्र आहे. मात्र एकाच क्रमांकाचा आधार कार्ड दोन व्यक्तींना मिळण्याची ही देशातील अपवादात्मक घटना असावी. आपल्याला नवीन आधार क्रमांक देण्यात यावा, या मागणीसाठी राजगडे यांनी अनेक आधार केंद्र तसेच कार्यालयांमध्ये विचारणा केली. मात्र अजूनपर्यंत त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. त्यामुळे आधारची अडचण कायम आहे.