प्रवाशांच्या प्रतिसादामुळे एसटीचे सीमाेल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:25 AM2021-07-10T04:25:32+5:302021-07-10T04:25:32+5:30

दुसऱ्या लाटेत काेराेना रूग्णांची संख्या कमी झाल्यानंतर एसटीला पूर्ण क्षमतेने बस साेडण्यास परवानगी देण्यात आली आहे. नागरिक विविध कामांसाठी ...

Boundary violation of ST due to passenger response | प्रवाशांच्या प्रतिसादामुळे एसटीचे सीमाेल्लंघन

प्रवाशांच्या प्रतिसादामुळे एसटीचे सीमाेल्लंघन

Next

दुसऱ्या लाटेत काेराेना रूग्णांची संख्या कमी झाल्यानंतर एसटीला पूर्ण क्षमतेने बस साेडण्यास परवानगी देण्यात आली आहे. नागरिक विविध कामांसाठी घराबाहेर पडण्यास सुरूवात झाली आहे. काेराेनाच्या कालावधीत बसेस बंद हाेत्या. या कालावधीत अनेकांनी दुचाकी वाहने खरेदी केली आहेत. त्यामुळे तालुकास्थळी जाण्यासाठी नागरिक एसटीवर अवलंबून राहिले नसल्याने एसटीला ग्रामीण भागातील फेऱ्यांमधून प्रवाशी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे एसटीने आता आपले लक्ष लांब पल्ल्याच्या बसेसकडे वळविले आहे. जास्तीत जास्त लांब पल्ल्याच्या बसेस साेडल्या जात आहेत. त्यातून चांगले उत्पन्न मिळत आहे.

बाॅक्स

हैदराबादसाठी दाेन बसेस

गडचिराेली आगारातून राेज सकाळी ८ वाजता हैदराबादसाठी बस साेडली जात आहे. ही बस सिराेंचा मार्गे जाते. अहेरी आगारातून राेज सायंकाळी ७ वाजता बस साेडली जाते. ही बस शयनयान आहे. ३० प्रवाशी बसू शकतात तर १५ प्रवाशी उभे राहू शकतात.

बाॅक्स

या मार्गावर धावतात बसेस

-गडचिराेली आगारातून हैदराबाद, उमरखेड, नांदेड, यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर या प्रमुख मार्गांवर बसेस साेडल्या जात आहेत. त्यात चंद्रपूर व नागपूरसाठी असलेल्या बसेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या मार्गावर बसेसची संख्या वाढविण्यात आली आहे.

- अहेरी आगारातून नागपूर, यवतमाळ, अमरावती, भंडारा, वर्धा, हैदराबाद या ठिकाणांसाठी बसेस साेडल्या जात आहेत.

बाॅक्स

प्रवाशी मिळतात त्याच मार्गावर बसेस सुरू

काेराेनामुळे एसटीचे आर्थिक संकट वाढले आहे. त्यातून सावरण्याचा प्रयत्न एसटी मार्फत केला जात आहे. ज्या मार्गावर प्रवाशी मिळत नाही. अशा मार्गावरील बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जात आहे. यामुळे एसटीचे उत्पन्न कमी असले तरी ताेटाही कमी हाेण्यास मदत हाेत आहे. दिवसाच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. जेवढ्या बसगाड्या चालविण्यात येत आहेत. त्यातून जवळपास ४८ टक्के भारमान मिळत आहे. एवढे भारमान काेराेनाच्या पूर्वीही मिळत हाेते.

एकूण आगार-२

एकूण बसेस-१८१

सध्या सुरू असलेल्या बसेस-१२४

पूर्वीच्या फेऱ्या-७८०

आत्ता सुरू असलेल्या फेऱ्या-४५२

पूर्वीचे उत्पन्न-१७ लाख

आत्ताचे उत्पन्न-९.५ लाख

Web Title: Boundary violation of ST due to passenger response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.