भरधाव ट्रकची दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2017 01:29 AM2017-01-08T01:29:49+5:302017-01-08T01:29:49+5:30

मूलवरून चामोर्शीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने भेंडाळानजीकच्या घारगाव वळणावर दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण गंभीर

Bourdain Truck Bike | भरधाव ट्रकची दुचाकीला धडक

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक

Next

दोन गंभीर : भेंडाळानजीकच्या घारगाव वळणावरील घटना
चामोर्शी : मूलवरून चामोर्शीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने भेंडाळानजीकच्या घारगाव वळणावर दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास चामोर्शी-मूल मार्गावर घडली.
पंचायत समिती चामोर्शी कार्यालयात लिपीक पदावर कार्यरत असलेल्या संध्या गुरनुले व त्यांचा भाऊ संजय वानखेडे रा. घुग्गुस जिल्हा चंद्रपूर असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. एमएच ३४ एई ७३२३ क्रमांकाच्या दुचाकीने संध्या गुरनुले व त्यांचा भाऊ संजय वानखेडे हे चामोर्शीकडे येत होते. तर चामोर्शीवरून एमएच ४३ ई ७११६ क्रमांकाचा कमल ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक धानाचे पोते घेऊन मूलकडे जात होता. दरम्यान ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भेंडाळा नजीकच्या घारगाव वळणावर दुचाकीला जबर धडक दिली. यात संध्या गुरनुले व संजय वानखेडे दोघेही गंभीर जखमी झाले.
चामोर्शीचे पं.स. सदस्य प्रमोद भगत यांनी स्वत:च्या रूग्णवाहिकेतून दोन्ही जखमींना चामोर्शीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी या दोन्ही जखमींना चंद्रपूरला हलविण्यात आले असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती कळताच चामोर्शीचे पोलीस निरिक्षक किरण अवचर हे स्वत: घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी येथील परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. या अपघातातील ट्रकचालक पळून जाऊ नये, यासाठी घटनास्थळावर जमालेल्या नागरिकांनी ट्रकच्या एका टायरची हवा सोडली. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरिक्षक किरण अवचार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
मूल ते चामोर्शी मार्गावर भेंडाळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रात्रीच्या सुमारासही या मार्गावर यापूर्वी अनेकदा अपघात घडले. चालकावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. (प्रतिनिधी)

Web Title: Bourdain Truck Bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.