हरविलेला ‘तो’ मुलगा सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:11 AM2017-12-10T00:11:19+5:302017-12-10T00:11:30+5:30

५ नोव्हेंबरपासून अचानक शाळा परिसरातून निघून गेलेला कोकडी येथील धनंजय नाकाडे आश्रमशाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी प्रकाश अशोक मडावी (१६) हा शुक्रवारी सापडला.

The boy got lost 'he' | हरविलेला ‘तो’ मुलगा सापडला

हरविलेला ‘तो’ मुलगा सापडला

Next
ठळक मुद्देआजीकडे सुपूर्द : छत्तीसगडच्या मानपुरातून शिक्षकांनी घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : ५ नोव्हेंबरपासून अचानक शाळा परिसरातून निघून गेलेला कोकडी येथील धनंजय नाकाडे आश्रमशाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी प्रकाश अशोक मडावी (१६) हा शुक्रवारी सापडला. देसाईगंज पोलिसांच्या सहकार्यातून सदर शाळा प्रशासनाने या विद्यार्थ्याला छत्तीसगडच्या मानपूर येथून ताब्यात घेऊन त्याला देसाईगंजच्या पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी प्रकाशला मुरमाडी येथील आजीकडे सुपूर्द केले.
प्रकाश मडावी हा ५ नोव्हेंबर २०१७ रोजी आश्रमशाळा परिसरातून देसाईगंज येथे सामान खरेदी करण्याच्या हेतूने निघून गेला. शाळा परिसरातून ट्रॅक्टरवर बसून तो भगतसिंग वार्डातून पुढे फवारा चौकात गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. याबाबत देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस व आश्रमशाळा प्रशासनाच्या वतीने शोधमोहीम सुरू होती. दरम्यान जिल्ह्यातील प्रमुख गावांमध्ये त्याचा शोध घेण्यात आला. दरम्यान प्रकाशने भट्टेगाव येथील रहिवासी याच आश्रमशाळेतील विद्यार्थी मित्राला फोन करून पुराडा येथे भेटण्यासाठी सांगितले होते. २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान प्रकाश हा पुराडा येथेच मुक्कामी होता. भटेगावचा त्याचा मित्र आजारी असल्याने तो स्वगावीच होता. कोकडीच्या शाळेत परत आल्यानंतर प्रकाश हा शाळेतून निघून गेला असल्याचे त्याच्या मित्राला कळले. त्यावेळी त्याने शिक्षकांना प्रकाशशी आपले फोनवर बोलणे झाले असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कॉल डिटेल्स मागवून तपास सुरू केला. नेमक्या याचवेळी छत्तीसगडच्या मानपूर येथील प्रकाशची मोठीआई कुमारी मडावी यांनी वर्ग शिक्षक भोयर यांना फोन करून प्रकाश मानपूर येथे असल्याचे सांगितले. त्यानंतर ९ डिसेंबरला पोलिसांच्या मदतीने आश्रमशाळा प्रशासनाने प्रकाशला पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्याला मुरमाडी येथील आजी विमल मडावी यांच्याकडे सुपूर्द केले.

Web Title: The boy got lost 'he'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.