दुचाकीच्या धडकेत बालक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:36 AM2017-07-22T00:36:19+5:302017-07-22T00:36:19+5:30

अज्ञात दुचाकीच्या धडकेने ७ वर्षीय बालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी अहेरीत घडली.

The boy was seriously injured in a wheelchair | दुचाकीच्या धडकेत बालक गंभीर जखमी

दुचाकीच्या धडकेत बालक गंभीर जखमी

Next

अहेरीतील घटना : वाहनचालक पसार
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अज्ञात दुचाकीच्या धडकेने ७ वर्षीय बालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी अहेरीत घडली.
आलेक्स मलय्या सुंदीला असे जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता आलेक्स आपल्या मित्रांसह खासगी शिकवणी वर्गातून घरी परत येत होता. मात्र अज्ञात दुचाकीने जुन्या तहसील कार्यालयाजवळील बायपास रस्त्यावरील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेक्सला जोरदार धडक दिली. त्यानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला. यात त्याचा उजवा पाय पूर्णपणे तुटला व पायाच्या हाडाचा तुकडा वेगळा पडला. त्याच्या डोक्यालाही जबर मार बसला. घटना परिसरात असलेल्या कामगारांनी आलेक्सला उचलून अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सीसीटीव्हीच्या मदतीने दुचाकीस्वाराचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने त्या दुचाकीचा पत्ता लागू शकला नाही. आलेक्सची परिस्थिती गंभीर असून अहेरी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. आलेक्स मलय्या सुंदीला याच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून तो कै. च. ल. मद्दीवार शाळेचा विद्यार्थी आहे. शाळेचे मुख्याध्यापक संतोष जोशी व अभय भोयर यांनी आलेक्सच्या उपचारासाठी तात्काळ २ हजार रुपयांची व शिकवणी वर्गाच्या शिक्षकांनी आर्थिक मदत केली.

Web Title: The boy was seriously injured in a wheelchair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.