पं.स.पदाधिकाऱ्यांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:22 AM2019-06-16T00:22:36+5:302019-06-16T00:22:53+5:30

तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्याकरिता ३० मे रोजी आ.कृष्णा गजबे यांच्या अध्यक्षतेखाली पं.स.मध्ये बीडीओंनी पाणीटंचाई व इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी आढावा सभा बोलाविली. परंतु या सभेतून सभापती, उपसभापती व इतर सदस्यांना डावलण्यात आले.

Boycott of pseudonym | पं.स.पदाधिकाऱ्यांचा बहिष्कार

पं.स.पदाधिकाऱ्यांचा बहिष्कार

Next
ठळक मुद्देबीडीओंवर कारवाईची मागणी । आढावा सभेत डावलल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्याकरिता ३० मे रोजी आ.कृष्णा गजबे यांच्या अध्यक्षतेखाली पं.स.मध्ये बीडीओंनी पाणीटंचाई व इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी आढावा सभा बोलाविली. परंतु या सभेतून सभापती, उपसभापती व इतर सदस्यांना डावलण्यात आले. त्यामुळे संवर्ग विकास अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करीत १५ जूनला आयोजित मासिक सभेवर सदस्यांनी बहिष्कार टाकला.
संवर्ग विकास अधिकारी मोहितकर यांनी ३० मे रोजी पार पडलेल्या आढावा सभेत आमंत्रित न केल्यामुळे आपल्या पं.स. क्षेत्रातील पाणीटंचाई व अन्य विषय आपल्याला सभेत मांडता आले नाही. तालुक्यातील वैरागड, भाकरोंडी, सालमारा, करपडा यासह अन्य ठिकाणी यंदा पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे पं.स.सदस्य पाणीटंचाई आढावा बैठकीची प्रतीक्षा करीत होते. परंतु संवर्ग विकास अधिकारी मोहितकर यांनी पं.स.सभापती, उपसभापती व अन्य तीन सदस्यांना डावलून आढावा सभा घेतली.
सभेला जाणूनबुजून व हेतूपुरस्सर आपल्याला बोलाविण्यात आले नाही. त्यामुळे आपल्या पं.स.क्षेत्रातील पाणीटंचाईची समस्या मांडता आली नाही. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला आहे. १५ जून रोजी आयोजित केलेल्या मासिक सभेवर आपण बहिष्कार टाकत असल्याचे पं.स.सभापती बबीता उसेंडी, उपसभापती यशवंत सुरपाम, पं.स.सदस्य विनोद बावनकर, पं.स.सदस्य वृंदा गजभिये, पं.स.सदस्य किरण मस्के यांनी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रकरणाची चौकशी करा
संवर्ग विकास अधिकारी मोहितकर यांनी जाणुनबुजून सभापती, उपसभापती व अन्य तीन सदस्यांना पाणीटंचाई आढावा सभेपासून डावलले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी पं.स. पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Web Title: Boycott of pseudonym

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.