ओबीसी महामोर्चाबाबत चामाेर्शीच्या सभेत विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:38 AM2021-02-11T04:38:24+5:302021-02-11T04:38:24+5:30

चामाेर्शी : ओबीसी प्रवर्गाच्या विविध प्रलंबित संविधानिक मागण्यांसाठी ओबीसी समाजातर्फे २२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामाेर्चा काढण्यात येणार आहे. या ...

Brainstorming on Chamarshi meeting on OBC front | ओबीसी महामोर्चाबाबत चामाेर्शीच्या सभेत विचारमंथन

ओबीसी महामोर्चाबाबत चामाेर्शीच्या सभेत विचारमंथन

Next

चामाेर्शी : ओबीसी प्रवर्गाच्या विविध प्रलंबित संविधानिक मागण्यांसाठी ओबीसी समाजातर्फे २२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामाेर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये चामोर्शी तालुक्यातून शेकडाेंच्या संख्येने सहभागी हाेण्याचा निर्धार सहविचार सभेत समाजबांधवांनी केला.

महामोर्चाचे नियोजन करण्याकरिता चामोर्शी येथे ओबीसी समाजबांधवांची सहविचार सभा प्रा. शेषराव येलेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विनायक बांदूरकर, परशुराम सातार, प्रा. रमेश बारसागडे, रवी बोमनवार, प्रा. दिनकर हिरादेवे, बाळू दहेलकर उपस्थित हाेते. सभेमध्ये मोर्चातील प्रमुख मागण्या, समाज संघटन, मोर्चाच्या प्रवासाचे नियोजन, मोर्चाची प्रचार प्रसिद्धी यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील ग्रामीण भागात गावागावांत जाऊन लोकांमध्ये ओबीसी प्रवर्गाचे प्रश्न, आरक्षण व नियोजित मोर्चाबाबत जाणीव-जागृती करून तालुक्यातून हजारोच्या संख्येने ओबीसीबांधव मोर्चात सहभागी करून घेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. सभेचे सूत्रसंचालन अतुल येलमुले यांनी केले तर भास्कर बुरे यांनी आभार मानले.

यावेळी प्रा. विठ्ठल चौथाले, प्रा. रवींद्र इंगोले, राहुल मुनघाटे, वैभव भिवापुरे, प्राचार्य हिराजी बनपूरकर, आनंदराव लोंढे, प्रदीप पोटवार, विनोद खोबे, संतोष चावरे, राहुल नैताम, निकू नैताम, सुनील कावळे, पोपेश्वर लडके, हिम्मतराव आभारे, दिलीप चलाख, ललिंद्रा वासेकर, ऋषी वासेकर, तुकाराम आभारे, देवानंद तुमडे, मनोहर दुधबावरे, एम. जी. दुधबावरे, रमेश कोठारे, पंकज खोबे, सदाशिव वाघरे, गजानन पोरटे, गंगाधर पाल, आशिष पिपरे, डी. जी. मोरांडे, पी. टी. हेटकर, प्रदीप पोद्दार, वासुदेव चिचघरे, शेषराव कोहळे, डी. पी. दुधबळे, वासुदेव दुधबावरे, राजू धोडरे, भाऊराव पोरटे, दिलीप सोमनकर, खुशाल कापगते, बबन वडेट्टीवार, कालिदास बुरांडे, साईनाथ बुरांडे, संजय लोणारे, प्रशांत सातार, ऋषिदेव कुनघाडकर, टिकाराम निखाडे, सुधीर शिवणकर, विनोद त्रिलोजवार, पुरुषोत्तम घ्यार, दिलीप चितारकर, वामन किनेकर, शिवराम मोगरकर, रघुनाथ भांडेकर, हरी मंगर, ओमदास झरकर आदी उपस्थित होते.

Web Title: Brainstorming on Chamarshi meeting on OBC front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.