बुद्धिस्ट साेसायटीच्या सभेत विचारमंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:19 AM2020-12-28T04:19:11+5:302020-12-28T04:19:11+5:30
देसाईगंज : दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची सभा फवारा चौकातील आर्यसत्य बुध्द विहारात घेण्यात आली. या सभेत धम्मप्रचार ...
देसाईगंज : दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची सभा फवारा चौकातील आर्यसत्य बुध्द विहारात घेण्यात आली. या सभेत धम्मप्रचार व बौध्दांची जनगणना या मुख्य विषयासह विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अभियंता नरेश मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून डाकराम वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते विजय बन्सोड, हंसराज लांडगे, त्रिरत्न समता संघाचे अध्यक्ष चंदुराव राऊत , सचिव एम.ए. रामटेके, कोषाध्यक्ष डॉ. मोरेश्वर बोरकर उपस्थित हाेते. बौध्द धम्माचा प्रचार, प्रसार करणे व जनगणनेत बौध्द म्हणून प्रत्येक कुटुंबाने नोंद करणे, असे निश्चित करण्यात आले. सभेला शिवराम मेश्राम, द्रोणाचार्य रामटेके, प्रा. प्रभाकर मेश्राम, राजविलास गायकवाड, बाळकृष्ण मेश्राम, गौतम लांडगे, गिरीधर मेश्राम, संतोष बहादुरे, जगदीश तामगाडगे, सुरेंद्र मून, संतोष मेंढे उपस्थित होते. सभेचे संचालन गौतम लांडगे तर आभार राजविलास गायकवाड यांनी मानले.