काेतवालांच्या समस्यांवर सभेत विचारमंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:34 AM2021-03-08T04:34:24+5:302021-03-08T04:34:24+5:30
सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कोतवाल बंडू कांबळे हाेते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा काेतवाल संघटनेचे समन्वयक गाेपाल ठवरे, अतिथी म्हणून दीपक ...
सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कोतवाल बंडू कांबळे हाेते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा काेतवाल संघटनेचे समन्वयक गाेपाल ठवरे, अतिथी म्हणून दीपक लिंगायत, येशुदास ढवळे उपस्थित होते. सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये तालुक्यातील सर्व कोतवालांना रात्र पाळी कर्तव्यावर नेमणे बंद करावे, कोतवालांचे मानधन महिन्याच्या २ तारखेला अदा करणे, कोतवालांचे निवडणूक काळातील आणि रात्रपाळीचे टीए बिल मंजूर करणे, वर्ग-ड मध्ये पदोन्नती झालेल्या कोतवालांना तत्काळ सामावून घेणे, तालुक्यातील कोतवालांना एसजीएसपी योजना लागू करणे, अटल पेन्शन योजना लागू करणे, काही कोतवालांचे एरिअस मंजूर करणे, ग्रा. पं. सार्वत्रिक निवडणूक २०२१ चे मानधन अदा करणे आदी मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करून सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. सभेनंतर तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना समस्या अवगत करण्यात आल्या. तहसीलदारांनी संबंधित लिपिकांना याबाबत निर्देश दिले. याप्रसंगी तालुक्यातील बहुसंख्य कोतवाल उपस्थित हाेते.