राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चूल पेटवून थापल्या भाकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:25 AM2021-07-04T04:25:05+5:302021-07-04T04:25:05+5:30

गडचिरोलीत गांधी चौकात पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार धर्मरावबाबा आत्राम व जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ...

Bread made by women office bearers of NCP | राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चूल पेटवून थापल्या भाकरी

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चूल पेटवून थापल्या भाकरी

Next

गडचिरोलीत गांधी चौकात पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार धर्मरावबाबा आत्राम व जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम यांच्या नेतृत्वात महिला पदाधिकाऱ्यांनी चूल पेटवून भाकऱ्या थापल्या. यावेळी गॅस व दुचाकी वाहनांना फुलांचा हार चढवून प्रतीकात्मक स्वरूपात तिलांजली दिली. दिवसेंदिवस गॅससोबतच पेट्रोल-डिझेलचे दर नवीन उच्चांक गाठत आहे. याचा निषेध म्हणून महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोवऱ्यांवर चूल पेटवून भाकरी थापल्या. केंद्र शासनाच्या विरोधात निषेध नोंदवून संताप व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकारने गॅस व इंधनाचे दर कमी न केल्यास अजून मोठ्या स्वरूपात आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात रा.काँ.चे जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, मुख्य सचिव संजय कोचे, विभागीय सचिव सोनाली पुण्यपवार, सरचिटणीस जगन जांभुळकर, विधानसभा अध्यक्ष गोकुलदास ठाकरे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, ओबीसी जिल्हाध्यक्ष विनायक झरकर, सामाजिक न्याय विभागाच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रमिला रामटेके, अल्पसंख्याक आघाडीचे मुस्ताक शेख, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, शहराध्यक्ष विजय धकाते, तसेच कपिल बागडे, इंद्रपाल गेडाम, मनीषा खेवले, सारिका गडपल्लीवार, ममता पटवर्धन, रेखा बारापात्रे, जितेंद्र मुप्पीडवार, अंकुश मामिडवार, पुरुषोत्तम सलामे, विठ्ठल निखुले, रूपेश ढोणे, प्रमोद गुंडावार, तुलाराम अंबादे, जुगणू पटवा, मलय्या कालवा, शंकर दिवटे, सविता चव्हाण, लता कोलते, अनिता कोलते, शैला कातकर, विद्या सीडाम, सुशीला मामिडवार, अर्चना नंदेश्वर, इंदिरा उराडे, रोशन राऊत, राजू पोटावर, रवींद्र चुधरी, मनोहर वाकडे, रवींद्र ठाकरे, विलास खेवले, रवींद्र डाखोरे, विनोद मानकर, निकेश जेठे, अरुण नैताम, नामदेव मांडोरे, महेश शेडमाके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Bread made by women office bearers of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.