चामोर्शी-मूल मार्गावरील झुडपे तोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:39 AM2021-08-19T04:39:45+5:302021-08-19T04:39:45+5:30
सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच आलापल्ली : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्याला ...
सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच
आलापल्ली : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड, आंध्र प्रदेश या राज्यांतून अवैध गुटखा विक्रीस आणला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सुगंधित तंबाखूची विक्री आता प्रचंड वाढली आहे.
अंगणवाड्यांचे बांधकाम अपूर्ण
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कक्षाच्यावतीने तीन वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातून एकूण ४३५ अंगणवाडी केंद्रांचे काम मंजूर करण्यात आले. यापैकी ३४२ वर कामे पूर्ण झाली असून, अनेक अंगणवाड्यांचे काम अद्यापही अपूर्ण आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ही समस्या साेडवावी, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे.
कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची मागणी
चामोर्शी : नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर चामोर्शी येथील घनकचरा व्यवस्थापनांतर्गत प्रभागवार जमा केलेला कचरा ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या व मोठ्या नहराच्या पाळीजवळ तसेच परिसरात टाकला जात आहे. त्यामुळे सर्वत्र घाण दिसून येते. आराेग्याच्या दृष्टिकाेनातून कचऱ्याचे व्यवस्थापन करून स्वच्छता बाळगणे गरजेचे आहे.
कमी रेंजमुळे भ्रमणध्वनीधारक त्रस्त
आष्टी : जयरामपूर परिसरातील भ्रमणध्वनी सेवा मागील अनेक दिवसांपासून विस्कळीत होत असल्याने या भागातील विविध कंपन्यांच्या भ्रमणध्वनी ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनी मनोऱ्याची रेंज वाढवावी, अशी मागणी परिसरातील शेकडाे ग्राहकांनी केली आहे. संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनीधारक उंच जागेचा आधार घेत असतात.
कोडसेपल्लीत समस्या सोडविण्याची मागणी
अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण होत आहे. परिणामी जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्यांचा उपसा हाेणे आवश्यक असताना, अनेक ग्रामपंचायती नाल्या उपसा करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्याच्या अनेक दुर्गम गावांत अनेक दिवसांपासून नाल्यांचा उपसा करण्यात आलेला नाही.