बीआरएसपीचे मुंडण आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 11:32 PM2017-11-09T23:32:56+5:302017-11-09T23:33:43+5:30

जिल्हा सामान्य रूग्णालयातील सिटी स्कॅन मशीन तत्काळ सुरू करण्यात यावी. प्रत्येक तालुक्याच्या रूग्णालयात एक्स-रे मशीन सुरू करावी, आदीसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी...

The Brenda movement of BRSP | बीआरएसपीचे मुंडण आंदोलन

बीआरएसपीचे मुंडण आंदोलन

Next
ठळक मुद्देजिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन : असुविधांबाबत कार्यकर्ते आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा सामान्य रूग्णालयातील सिटी स्कॅन मशीन तत्काळ सुरू करण्यात यावी. प्रत्येक तालुक्याच्या रूग्णालयात एक्स-रे मशीन सुरू करावी, आदीसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी गडचिरोलीच्या वतीने बीआरएसपीचे विदर्भ प्रदेश सचिव डॉ. कैलाश नगराळे यांच्या मार्गदर्शनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयासमोर गुरूवारी मुंडण आंदोलन केले.
गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात शासकीय आरोग्य सुविधा तोकड्या आहेत. यामुळे जिल्हाभरातून तसेच लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातून मोठ्या संख्येने रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयात औषधोपचारासाठी भरती होतात. मात्र येथील सिटी स्कॅन मशीन गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने सर्वसामान्य रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना चंद्रपूर व नागपूर येथील शासकीय रूग्णालय गाठावे लागत आहे. गरीब रूग्णांना सिटी स्कॅन सेवेसाठी प्रवास खर्चाचा भूर्दंड भरून द्यावा लागत आहे. ओपीडीच्या वेळेस जिल्हा रूग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी रूग्णालयात उपस्थित नसतात. त्यामुळे त्यांची उपस्थिती ओपीडीच्या वेळेस अनिवार्य करण्यात यावी, तसेच कंत्राटी भरती पध्दत बंद करावी, इंदिरा गांधी चौकातील स्वतंत्र महिला रूग्णालयास सावित्रीबाई फुले महिला रूग्णालय असे नाव देण्यात यावे, जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाºयांचे रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, शासकीय रूग्णालयात मृत्यू झालेल्या रूग्णास रूग्णवाहिकेद्वारे मोफत घरी पोहोचविण्याची सुविधा करण्यात यावी आदी मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने मुंडण आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान बीआरएसपीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, गडचिरोली विधानसभा अध्यक्ष पुरूषोत्तम रामटेके, जिल्हा सचिव सदस्य निमगडे, उपाध्यक्ष लक्ष्मण नागदेवते, मीडिया प्रभारी प्रतिक डांगे, तालुकाध्यक्ष विवेक बारसिंगे, शहर अध्यक्ष मिलिंद बांबोळे, मोहन मोटघरे, सचिन गेडाम, देवा बनकर, घनश्याम खोब्रागडे, दीपक बोलीवार, संघरक्षक बांबोळे, गोकुल ढवळे, तुषार भडके, सुरज खोब्रागडे, जितेंद्र बांबोळे, रितेश अंबादे, प्रफुल्ल रायपुरे, विजय देवतळे, धनंजय बांबोळे, बबलू बांबोळे, पियूष वाकडे, विवेक निमगडे, मुकेश सहारे, जयंत पिल्लावन, जयपाल चहांदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंडण केल्यानंतर बीआरपीएसपीच्या शिष्टमंडळाने जिल्हा शल्य चिकित्सकांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

दोन महिन्यात सिटीस्कॅन मशीन मिळणार
जिल्हा सामान्य रूग्णालयातील सिटीस्कॅन मशीन लवकर सुरू करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांना गुरूवारी दिले. त्यानंतर पदाधिकाºयांनी काँग्रेसचे विधीमंडळ उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांना भ्रमणध्वनीवरून ही समस्या सांगितली. आमदार वडेट्टीवार यांनी लागलीच राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सिटीस्कॅन मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. ना. सावंत यांनी दोन महिन्यांच्या आत गडचिरोलीच्या जिल्हा रूग्णालयात सिटीस्कॅन मशीन पाठवू अशी ग्वाही दिली. त्यामुळे आता लवकरच सिटीस्कॅन मशीन मिळणार आहे. निवेदन देताना जि.प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, युकाँचे लोकसभा क्षेत्र सचिव कुणाल पेंदोरकर, उपसरपंच कमलेश खोब्रागडे, पंकज बारसिंगे नंदू सोमनकर आदी उपस्थित होते.
आरोग्य प्रशासन हादरले
जिल्हा सामान्य रूग्णालयातील विविध समस्या व असुविधांच्या तसेच सिटीस्कॅनच्या मुद्यावर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी व युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी रूग्णालय परिसरात आंदोलन करून निवेदन दिले. रूग्णालय परिसरात प्रथमच मुंडण आंदोलन झाल्याने रूग्णालय प्रशासन काही वेळासाठी हादरले होते.

Web Title: The Brenda movement of BRSP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.