फेरफारसाठी सहा हजारांची लाच, मंडळाधिकारी, तलाठी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 10:50 PM2024-08-02T22:50:14+5:302024-08-02T22:50:25+5:30

'एसीबी'चा दणका: अहेरी तालुक्यातील महागावात कारवाई.

Bribe of 6000 for change board officer Talathi arrested | फेरफारसाठी सहा हजारांची लाच, मंडळाधिकारी, तलाठी अटकेत

फेरफारसाठी सहा हजारांची लाच, मंडळाधिकारी, तलाठी अटकेत

संजय तिपाले/गडचिरोली

गडचिरोली: शेतजमीन फेरफार करुन सातबारावर नावे लावण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच मागणी करुन ६ हजार रुपये स्वीकारणाऱ्या मंडळाधिकारी व तलाठ्यास २ ऑगस्टला जेरबंद करण्यात आले. ही कारवाई महागाव (ता. अहेरी) येथे २ ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता  करण्यात आली.

खमनचेरु येथील मंडळ अधिकारी भूषण रामभाऊ जवंजाळकर (३८) वर्ग ३ व व्यंकटेश सांबय्या जल्लेवार (४०) वर्ग ३ यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. महागाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा फेरफार करुन सातबारावर तीन नावे लावायची होती . त्यासाठी तलाठी व्यंकटेश जल्लेवार याने प्रत्येकी ३ हजार रुपयांप्रमाणे तीन नावे लावण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच मागणी केली. तडजोडीनंतर ६ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचमागणी पडताळणी करुन २ ऑगस्टला सापळा लावला. जल्लेवार याने तक्रारदाराकडून सहा हजार रुपये स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास पकडले, त्यानंतर मंडळाधिकारी भूषण जवंजाळकर यालाही ताब्यात घेतले.

एसीबीचे उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले, पो.नि. शिवाजी राठोड, सहायक फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार शंकर डांगे, किशोर जौंजारकर, अंमलदार प्रवीण जुमनाके यांनी कारवाई केली.
 
२४ तासांत दुसरी कारवाई
१ ऑगस्टला लाच मागणी केल्याप्रकरणीधानोरात बांधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता अक्षय आगळे यास अटक करण्यात आली, त्यानंतर २ ऑगस्टला अहेरीत मंडळाधिकारी व तलाठ्यास लाच घेताना पकडले. २४ तासांत एसीबीने दोन कारवायांत तिघांना जेरबंद केल्याने लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Bribe of 6000 for change board officer Talathi arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.