पुलामुळे ३० वर्षांची अडचण दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:28 PM2018-08-27T22:28:44+5:302018-08-27T22:29:09+5:30

वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीवर कमी उंचीचा पूल आहे. या पुलामुळे मागील वर्षीपर्यंत दरवर्षी २० गावांची वाहतूक प्रभावित होत होती. परंतु २०१७-१८ या वर्षात नदीवर नवीन पुलाची निर्मिती झाल्याने यंदा पावसाळ्यात वाहतूक प्रभावित झाली नाही. अनेक वर्षांपासून पावसाळ्यात निर्माण होणारी अडचण या पुलामुळे दूर झाली आहे.

The bridge is 30 years old | पुलामुळे ३० वर्षांची अडचण दूर

पुलामुळे ३० वर्षांची अडचण दूर

Next
ठळक मुद्देवैरागडलगतची वैलोचना नदी : पावसाळ्यात होत असे २० गावांची वाहतूक प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीवर कमी उंचीचा पूल आहे. या पुलामुळे मागील वर्षीपर्यंत दरवर्षी २० गावांची वाहतूक प्रभावित होत होती. परंतु २०१७-१८ या वर्षात नदीवर नवीन पुलाची निर्मिती झाल्याने यंदा पावसाळ्यात वाहतूक प्रभावित झाली नाही. अनेक वर्षांपासून पावसाळ्यात निर्माण होणारी अडचण या पुलामुळे दूर झाली आहे.
१९८७-८८ या वर्षात वैरागड-मानापूर मार्गावर असलेल्या वैलोचना नदीलगत कमी उचींचा व ज्या ठिकाणातून बारमाही पाणी वाहत असते, अशा ठिकाणी नदी पात्रात रस्ता व पूल तयार करण्यात आला. पावसाळ्यात या पुलावरून अनेकदा पुराचे पाणी वाहत असायचे. परिणामी मोहझरी, सुकाळा, मानापूर, देलनवाडी, अंगारा, पिसेवडधा, भाकरोंडी परिसरातील २० गावांच्या वाहतुकीचा खोळंबा व्हायचा. मागील वर्षात पुरामुळे तब्बल नऊवेळा या पुलावरून वाहतूक बंद राहिली. नदी पलिकडे वैरागड येथील अनेक शेतकºयांची शेती आहे. अशा शेती कामावर परिणाम झाला. या नदीवरील कमी उंचीच्या पुलाची समस्या आमदार कृष्णा गजबे यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी प्राधान्याने निधी मंजूर होण्यासाठी पाठपुरावा केला. निधी मंजूर झाल्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये पुलाचे काम सुरू झाले व मे २०१८ मध्ये पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाली. मागील ३० वर्षांपासून नागरिकांना असलेली उंच पुलाची प्रतीक्षा पूर्णत्वास आली. या पुलाच्या बांधकामाकरिता लोकमतने अनेकदा वृत्त प्रकाशित करून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधले होते. पुलावरून पाणी असतानाही नागरिक शेतात काम करण्याकरिता जीव धोक्यात घालून जायचे. याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी वृत्ताची दखल घेऊन पुलाची पाहणीही केली होती.

Web Title: The bridge is 30 years old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.