मेडीगड्डा धरणावरील पूल खचला, दरवाजे उघडल्याने २० गावांतील शेतकऱ्यांना फटका

By संजय तिपाले | Published: October 22, 2023 12:30 PM2023-10-22T12:30:11+5:302023-10-22T12:31:03+5:30

...त्यामुळे महाराष्ट्रातील १५ ते २० गावांतील शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

Bridge on Medigadda dam collapses, farmers of 20 villages hit by opening gates | मेडीगड्डा धरणावरील पूल खचला, दरवाजे उघडल्याने २० गावांतील शेतकऱ्यांना फटका

मेडीगड्डा धरणावरील पूल खचला, दरवाजे उघडल्याने २० गावांतील शेतकऱ्यांना फटका

गडचिरोली : महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवरील सिरोंचाजवळील पोचमपल्लीनजीक तेलंगणा सरकारच्या कालेश्वरम मेडीगड्डा धरणावरील पुलाचा पाया २१ ऑक्टोबरला रात्री खचल्याने अचानक गोदावरील नदीत विसर्ग केला. त्यामुळे महाराष्ट्रातील १५ ते २० गावांतील शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

 महाराष्ट्र- तेलंगणा सीमेेवरील मेडीगड्डा धरणाच्या बॅक वॉटरमुळे महाराष्ट्रातील शेकडो एकर शेतीचे नुकसान होते. या धरणाला सुरुवातीपासून शेतकऱ्यांचा विरोध आहे. दरम्यान, २१ ऑक्टोबरला रात्री उशिरा अचानक  मेडीगड्डा धरणावरील महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांना जोडणारा गोदावरी नदीवरील पुलाचे २०,२१ व २२ क्रमांकाचे खांब खचले. त्यामुळे सायरनद्वारे सूचना देऊन दाेन्ही बाजूंनी रस्ता वाहतुकीसाठी तातडीने बंद केला. त्यानंतर धरणाचे काही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यत आला.

सिंचन विभागाचे तज्ज्ञ अभियंता व वरिष्ठ अधिकारी तेथे तळ ठोकून आहेत, सध्या युध्दपातळीवर दुरुस्तीकाम सुरु आहे

तथापि, आनक पाणी सोडल्याने आसरअल्ली, सोमनू, संगम, टेकडामोटला अशा १५ ते २० गावांतील शेतकऱ्यांना याचा फटका बसला. नदीकाठी सिचंनासाठी विद्युतपंप, पाईप, वायर या पाण्यात वाहून गेले. मिरची, कापूस उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले आहेे. 

मेडीगड्डा प्रकल्प सिरोंचा तालुक्यातील लोकांसाठी नुकसानकारक आहे. बॅकवॉटरमुळे दरवर्षी शेतीचे नुकसान होते. आता पूल खचल्याने अचानक विसर्ग केल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. बाधित शेतकऱ्यांना तातडीन भरपाई द्यावी.  
- चंद्रशेखर पुलगम, सामाजिक कार्यकर्ते

मेडीगड्डा धरण तेलंगणाचे अन् नुकसान महाराष्ट्राचे... अशी परिस्थिती आहे. यासंदर्भात तातडीने उपाययोजना करावेत. सरकारने लोकांचे आयुष्य जोखमीत टाकू नये. परिसरातील सर्व गावांना प्रकल्पग्रस्त घोषित करुन भरपाई तात्काळ द्यावी.
- संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते

रात्री पुलाचा ही भाग खचल्याचे निदर्शनास आल्यावर तातडीने रहदारी बंद केली. तेथे सिंचन विभागाकडून दुरुस्तीकाम सुरु आहे. नागरिकांना दक्षतेचे आवाहन केले आहेे. योग्य ती खबरदारी घेतली जात असून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य आहे.
- जितेंद्र शिकतोडे, तहसीलदार सिरोंचा
 

Web Title: Bridge on Medigadda dam collapses, farmers of 20 villages hit by opening gates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.