कठाणी नदीवरील पुलाचे काम संथगतीने
By admin | Published: June 18, 2017 01:27 AM2017-06-18T01:27:07+5:302017-06-18T01:27:07+5:30
जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने गडचिरोली-आरमोरी मार्गावरील
पिलर पूर्ण : ३१ मार्चपर्यंत होती मुदत
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने गडचिरोली-आरमोरी मार्गावरील कठाणी नदीवरील पुलाचे काम मंजूर करण्यात आले. गेल्या दोन वर्षापासून पुलाचे काम सुरू आहे. मात्र पुलाच्या कामात गती नसल्याने हे काम अपूर्णच आहेत. पिलरचे काम पूर्ण झाले असून इतर काम शिल्लक आहे.
पावसाळ्यात कठाणी नदीला पूर येऊन आरमोरी-नागपूर मार्गावरील वाहतूक बंद होते. परिणामी गडचिरोली जिल्ह्याचा आरमोरी तालुक्याशी संपर्क तुटतो. ही समस्या मार्गी लावण्यासाठी कोट्यवधी रूपयातून पुलाचे काम मंजूर करण्यात आले आहे. मात्र हे काम पूर्ण न झाल्याने यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा वाहतूक ठप्प होणार आहे.