कोट्यवधींचा निधी आणला मात्र पदाधिकारी नियोजनात फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2020 05:00 AM2020-11-01T05:00:00+5:302020-11-01T05:00:17+5:30

विसापूर व हनुमान वॉर्डात अपुरा पाणीपुरवठा होत होता. नगर परिषदेने दोन्ही वॉर्डांसाठी प्रत्येकी अडीच कोटी रुपयांच्या पाण्याच्या टाक्या बांधल्या. तसेच दोन कोटी रुपये खर्चुन या वॉर्डांसोबतच शहरातील नवीन वस्त्यांमध्ये वाढीव पाईपलाईन टाकण्यात आली आहे. शहरातील काही वॉर्डामध्ये मात्र अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. याही वॉर्डांना समान पाणीपुरवठा होण्याची गरज आहे.

Bring in crores of funds but the office bearers fail in planning | कोट्यवधींचा निधी आणला मात्र पदाधिकारी नियोजनात फेल

कोट्यवधींचा निधी आणला मात्र पदाधिकारी नियोजनात फेल

Next
ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद । गडचिरोली शहरातील विकास कामे संथगतीने सुरू

दिगांबर जवादे
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांना दिलेले आश्वासन पाळत नगराध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी राज्यशासनाकडे पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला. नियोजनाअभावी विकास कामे सुरू होण्यास विलंब होत आहे. ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांच्या कामांना वर्क ऑर्डर देण्यात आले आहे. मात्र या कामांना अजूनपर्यंत सुरूवात झाली नाही. रेती, पावसाळा व कोरोनाची कारणे नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असले तरी हीच कामे अगोदरच सुरूवात झाली असती.

गटरलाईन
गडचिरोली शहराच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या गटारलाईनसाठी शासनाने सुमारे ९६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या गटारलाईनच्या कामाला सुरूवात झाली आहे. जवळपास ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. गटारलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदले जातात. मात्र वेळेवर ते दुरूस्त केली जात नसल्याची ओरड नागरिकांडून केली जात आहे. मात्र गटारलाईनचे काम नियमित सुरू आहे.

पाणीपुरवठा
विसापूर व हनुमान वॉर्डात अपुरा पाणीपुरवठा होत होता. नगर परिषदेने दोन्ही वॉर्डांसाठी प्रत्येकी अडीच कोटी रुपयांच्या पाण्याच्या टाक्या बांधल्या. तसेच दोन कोटी रुपये खर्चुन या वॉर्डांसोबतच शहरातील नवीन वस्त्यांमध्ये वाढीव पाईपलाईन टाकण्यात आली आहे. शहरातील काही वॉर्डामध्ये मात्र अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. याही वॉर्डांना समान पाणीपुरवठा होण्याची गरज आहे.

सीसी रोड
गडचिरोली शहरात सुमारे ३० कोटी रुपयांचे सिमेंट कॉंकीटचे रोड मंजूर आहेत. सर्वच प्रशासकीय प्रक्रिया आटोपली आहे. मात्र ही कामे रेतीअभावी ठप्प पडली आहेत. नगरोत्थान योजनेतून ८५ लाख रुपयांचे वाढीव पोल टाकण्यात आले तर ६५ लाख रुपयांमधून दलित वस्तीत खांब टाकले जाणार आहेत. पाच कोटी रुपये खर्चुन २६ ओपन स्पेसचा विकास करण्यात आला आहे. १६ शौचालये बांधली आहेत.

सिमेंट कॉंकीटची कामे रेतीअभावी वर्षभरापासून ठप्प पडली आहेत. तर काही कामे लॉकडाऊनमुळे थांबली होती. लॉकडाऊन उठवताच कामांना सुरूवात झाली आहे. गटारलाईनचे काम ४० टक्के पूर्ण झाले आहेत. पावसाळा संपल्याने कामांना गती येईल.
- योगीता पिपरे, नगराध्यक्ष

शहरातील जनतेने भाजपला एकहाती सत्ता दिली. मात्र पदाधिकाऱ्यांमध्ये आपसात मतभेद असल्याने नियोजन होत नाही. २६ डिसेंबर २०१९ पासून एकही मासिक सर्वसाधारण सभा पार पडली नाही. प्रशासनावर पदाधिकाऱ्यांचे वचक नाही.
- सतीश विधाते, विरोधी पक्षनेते

Web Title: Bring in crores of funds but the office bearers fail in planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.