ब्रॉडबॅन्ड सेवेचे वाजले तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:45 PM2019-02-11T22:45:16+5:302019-02-11T22:45:53+5:30
शहरातील ब्रॉडबॅन्ड सेवा मागील १५ दिवसांपासून सातत्याने विस्कळीत होत असल्याने याचा मोठा त्रास व्यापारी, शासकीय कार्यालये व अन्य ग्राहकांना बसत आहे. यामुळे बीएसएनएलचे ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. परंतू समस्या नेमकी कुठे आहे आणि कशामुळे आहे याचे नेमके उत्तर ही सेवा देणाऱ्या खासगी एजन्सीसह बीएसएनएलच्या अधिकाºयांकडेही नाही. या समस्येचे खापर एकमेकांवर फोडून खासगी एजन्सीधारक आणि बीएसएनएलचे अधिकारी ग्राहकांना वेठीस धरत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरातील ब्रॉडबॅन्ड सेवा मागील १५ दिवसांपासून सातत्याने विस्कळीत होत असल्याने याचा मोठा त्रास व्यापारी, शासकीय कार्यालये व अन्य ग्राहकांना बसत आहे. यामुळे बीएसएनएलचे ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. परंतू समस्या नेमकी कुठे आहे आणि कशामुळे आहे याचे नेमके उत्तर ही सेवा देणाऱ्या खासगी एजन्सीसह बीएसएनएलच्या अधिकाºयांकडेही नाही. या समस्येचे खापर एकमेकांवर फोडून खासगी एजन्सीधारक आणि बीएसएनएलचे अधिकारी ग्राहकांना वेठीस धरत आहेत.
सद्यस्थितीत बहुतांश कामे आॅनलाईन झाली असल्याने इंटरनेटशिवाय कोणतेही काम होत नाही. विशेष करून गडचिरोली शहरात जिल्हास्तरीय कार्यालये आहेत. तालुकास्तरावरून प्राप्त झालेली माहिती थेट मंत्रालयापर्यंत दरदिवशी पाठवावी लागते. पण इंटरनेट नसल्यास सर्वच कामे ठप्प होऊन जातात. मागील १५ दिवसांपासून गडचिरोली शहरातील इंटरनेट सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. कधीकधी इंटरनेट पूर्णपणे बंद होते, तर कधी इंटरनेटची गती अतिशय संथ राहाते. त्यामुळे एकही काम धड होताना दिसत नाही. त्यामुळे इंटरनेट वापरकर्ते त्रस्त झाले आहेत.
साध्या ब्रॉडबॅन्डच्या तुलनेत ओएफसीची (आॅप्टीकल फायबर केबल) गती अधिक राहाते, असे सांगण्यात आल्याने काही खासगी कार्यालयांनी अधिकचे पैसे भरून खासगी एजन्टमार्फत ओएफसी केबल जोडून घेतले आहेत.
मात्र इंटरनेच्या गतीमध्ये फारसा फरक पडण्याऐवजी वारंवार सेवे येणारे अडथळे वाढले असल्याचा अनुभव अनेक जण घेत आहेत. त्यामुळे ओएफसी सेवेविषयी सुध्दा ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा बोगस सेवेमुळे बीएसएनएलबाबत कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.
खासगी आॅपरेटरचेही नेटवर्क ढेपाळले
बीएसएनएलच्या सेवेवर बोटे मोडत काही ग्राहकांनी खासगी संस्थांचे सीमकार्ड खरेदी केले. काही दिवस मोफत सेवा दिल्याने मोठ्या प्रमाणात ग्राहक जोडले. परंतू ज्या तुलनेत ग्राहक वाढले, त्या तुलनेत नेटवर्क सक्षम झाले नाही. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक वाढलेल्या ग्राहकांना सेवा देताना खासगी आॅपरेटरची सेवा कोलमडत चालली आहे. विशेष करून सायंकाळी मोबाईलची इंटरनेट सेवा ठप्प पडते. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. अनेकांनी मोफत डेटा देणाºया कंपनीला रामराम ठोकत इतर कंपन्यांना पसंती दर्शवित आहेत.
शेकडो लँडलाईन फोन झाले ‘डेड’
शहरातील मुख्य मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी केलेल्या खोदकामात बीएसएनएलचे अनेक केबल तुटले आहेत. त्यामुळे शहरातील शेकडो लँडलाईन फोन गेल्या १५ दिवसांपेक्षा अधिक काळापासून बंद पडले आहेत. बहुतांश फोन सरकारी कार्यालयांमधील असल्यामुळे आपल्या कामासाठी फोन करणाºया सामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. परंतू हे फोन कधी सुरू होणार याची शाश्वती बीएसएनएलचे अधिकारीही देऊ शकत नाहीत.